Pakistan Cricket News: संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाने (ECB) काही दिवसांपूर्वीच 28 वर्षीय क्रिकेटपटू उस्मान खानवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. असे असतानाच आता पाकिस्तान त्याला टी20 संघात खेळवण्याचा विचार करत आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अध्यक्ष मोहसीन नाकवी यांनी माहिती दिली आहे.
ईसीबीने गेल्याच आठवड्यात उस्मानवर संयुक्त अरब अमिराती क्रिकेटप्रती दायित्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 5 वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे 2029 पर्यंत त्याला ईसीबीच्या अंतर्गत कोणतेही क्रिकेट खेळता येणार नाही.
त्याने युएई संघाकडून खेळण्याच्या त्याच्या निर्णयाचा चूकीच्या पद्धतीने उपयोग केल्याचे आढळून आले आणि त्याने ईसीबीने दिलेल्या संधीचा उपयोग इतर संधी शोधण्यासाठी केल्याचा आरोपही ईसीबीने केला. त्यामुळे आता त्याच्यावर बंदी घातली आहे.
अशातच जिओ न्यूजशी बोलताना नाकवी यांनी सांगितले की 'उस्मान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खेळण्यास पात्र आहे.'
खरंतर उस्मान खानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये शानदार फलंदाजी केली होती. त्यानंतरच तो पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत होता. तसेच नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 29 खेळाडूंचा फिटनेस कॅम्प घेण्यात आला होता.
त्या कॅम्पमध्ये उस्मान खानही सामील झाला होता. त्यामुळे तो आगामी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघात निवड होण्याच्या शर्यतीतही उस्मान आहे.
न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार असून 18 एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. कारण जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याचदृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. पाकिस्तान या मालिकेनंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धही टी20 सामने खेळणार आहे.
तथापि, ही मालिका खेळण्यापूर्वी पाकिस्तानला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचीही निवड करायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.