Pakistan Cricket Board AI : पाकिस्तान क्रिकेट संघाला घरच्या मैदानावरही लाजीरवणाऱ्या पराभावचा सामना करावा लागला. बांगलादेशने रावळपिंडी कसोटीत १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर जोरदार टीका झाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी आर्मीकडून ट्रेनिंग घेतलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता तर ते AI ची मदत घेण्याच्या तयारीत आहेत.
प्रत्येक मालिकेनंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या खेळाडूंची आकडेवारी मांडली जाणार आहे. त्यासाठी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने AI ची मदत घेण्याचे ठरवले आहे. PCB चे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील टॅलेंट शोधण्यासाठी AI चा वापर केला जाईल, जेणेकरून या खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडता येईल. IT क्षेत्रात, ई कॉमर्स आणि अन्य व्यावसायांत AI चा वापर केला जातो. आता संघ निवडीसाठी केला जाणार आहे आणि असा प्रयोग करणारा पाकिस्तान हा पहिलाच देश असेल.
नक्वी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर नक्वी यांनी संघाच्या सर्जरीची गरज असल्याचे जाहीर विधान केले होते.
''आमच्याकडे दुसऱ्या फळीचे खेळाडूच नाहीत, त्यामुळे निवड समितीकडे पर्याय नाहीत. ही खरी समस्या आहे. त्यामुळेच मी सर्जरीबाबत बोललो. या समस्या सोडवायला हव्या.. पण, जेव्हा या समस्या सोडवण्याबाबत आम्ही बोलतो, तेव्हा आमच्याकडे तसा डाटाच उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व सिस्टममध्ये गोंधळाचं वातावरण आहे. चॅम्पियन कपमधून आम्हाला काही चांगले खेळाडू मिळतील आणि त्यातील खेळाडूंचा डाटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,''असे ते म्हणाले.
आतापर्यंत १५० खेळाडूंची निवड आम्ही केली आहे आणि AI च्या माध्यमातून त्यांची निवड केली गेली आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप २० टक्केच आहे. ''१५० खेळाडूंची जी निवड झाली आहे, त्यात ८० टक्के AI च्या मदत घेतली आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.