Pakistan Cricket Team Army Training : ...म्हणून संघाला आर्मी ट्रेनिंग! हास्यास्पद कारण देत पीसीबी प्रमुखांनीच संघाची काढली लायकी

Pakistan Cricket Team Fitness : पीसीबी चेअरमन आपल्याच संघाबद्दल असं काही बोलले की... बाबर सेनेला नक्कीच हे आवडणार नाही.
babar azam
babar azamesakal
Updated on

Pakistan Cricket Team Army Training : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी संघातील खेळाडूंना आर्मी ट्रेनिंगची गरज असल्याचं वक्तव्य केलं. त्यांनी संघाची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी याची गरज असल्याचं सांगितलं.

हा कॅम्प 25 मार्च ते 8 एप्रिलदरम्यान आयोजित केला जाणार असल्याचे वृत्त इएसपीएन क्रिकइन्फोने दिले आहे. नक्वी यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू हे इस्लामाबादच्या हॉटेलमध्ये असताना ही घोषणा केली. मात्र यावेळी नक्वी यांनी एक अजब कारण देखील दिलं.

babar azam
Olympic Qualifying Tournament : थापा, देवकडून भारताला अपेक्षा

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार नक्वी म्हणतात, 'मी ज्यावेळी लाहोर येथे सामने पाहत होते त्यावेळी मला जाणवलं की पाकिस्तान संघातील एकाही खेळाडूकडे स्टँडमध्ये षटकार मारण्याची क्षमता आहे.'

'ज्यावेळी अशा प्रकारचा षटकार मारला जातो त्यावेळी मला एक विदेशी खेळाडूच असं करू शकतो असं वाटत. मी बोर्डाला खेळाडूंचा फिटनेस वाढवण्यासाठी एक योजना आखण्याची विनंती केली होती. तुम्हाला अशा प्रकारची पॉवर हिटिंग करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.'

babar azam
Women IPL 2024 : चौथ्या विजयासह दिल्ली पहिल्या स्थानावर कायम ; गतविजेत्या मुंबईचा दुसरा पराभव

नक्वी पुढे म्हणाले की, 'न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात येणार आहे. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड देखील आपल्या देशाचा दौरा करणार आहेत. यानंतर आपल्याला टी 20 वर्ल्डकप खेळायचा आहे. मला आश्चर्य वाटलं की आपण ट्रेनिंग करायचं तरी कधी, वेळच नाहीये.

'मात्र आम्हाला संधी मिळाली. आम्ही काकुल येथील लष्करी अकादमीत सराव सत्र आयोजित केलं आहे. हे सराव सत्र 25 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत होईल. पाकिस्तान आर्मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. आशा आहे की ते तुम्हाला मदत करतील.'

babar azam
IND vs ENG 5th Test : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं दुसऱ्यांदाच होणार, अश्विन-बेअरस्टोमुळं अनोखा योगायोग

फिटनेस कॅम्पच्या टायमिंगवरून वादंग?

पीसीबी चेअरमनच्या इच्छेखातर ठेवण्यात आलेल्या फिटनेस कॅम्पच्या टायमिंगवरून वाद होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर लगेचच हा कॅम्प सुरू होणार आहे. या काळात पाकिस्तानच्या खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज आहे.

पाकिस्तान संघ देखील काही महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत हा फिटनेस कॅम्प करणं धोक्याचं ठरू शकतं. हा कॅम्प रमजान महिन्यातच आयोजित केला जाणार आहे. संघातील अनेक खेळाडू यावेळी उपवास करत असतात.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.