PAK vs BAN 2nd Test: पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का; बांगलादेशविरुद्ध मालिका वाचवण्याचे आव्हान

PAK vs BAN 2nd Test : WTC क्रमवारीत पाकिस्तानचा संघ २२ गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे, तर बांगलादेशची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दोन्ही संघांमधील दुसरी कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
PAK vs BAN 2ndTest
PAK vs BAN 2ndTestesakal
Updated on

PAK vs BAN 2nd Test Pakistan squad: बांगलादेशकडून पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाने उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. पहिल्या कसोटीत बांगलादेशने १० विकेट्सने पाकिस्तानला पराभूत केले होते आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ICC ची कारवाई...

पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना षटकं निर्धारित वेळेत पूर्ण करता आली नाहीत आणि आयसीसीने नियमानुसार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील त्यांच्या गुणांवर कात्री लावली. त्यामुळे पाकिस्तानची WTC Final खेळण्याची संधी मावळली आहे. यजमान पाकिस्तान कसोटी सामन्यात सहा षटकं मागे राहिले आणि त्यामुळे WTC गुणांमध्ये त्यांचे सहा गुण कमी झाले, तर बांगलादेशलाही ३ गुणांचा फटका बसला. याशिवाय पाकिस्तानला त्यांच्या मॅच फीमधील ३० टक्के व बांगलादेशला १५ टक्के दंड भरावा लागणार आहे.

PAK vs BAN 2ndTest
Jacob Oram: भारतीय संघाची 'कोंडी' करण्यासाठी न्यूझीलंडचा मास्टर प्लान; जुन्या सहकाऱ्याला मदतीसाठी बोलावलं

WTC क्रमवारीत पाकिस्तानचा संघ २२ गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे, तर बांगलादेशची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दोन्ही संघांमधील दुसरी कसोटी शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

पाकिस्तानचा संघ, शाहिनला विश्रांती

पहिल्या कसोटी दरम्यान जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Shah Afridi ) हा बाबा झाला होता आणि त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पाकिस्तानने आज जाहीर केलेल्या दुसऱ्या कसोटीतील १२ सदस्यांमध्ये शाहिनचे नाव नव्हते.. मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी शाहीन खेळणार नसल्याचे जाहीर केले.

पाकिस्तानचा संघ - अद्बुल्लाह शाफिक, सईम याकुब, शान मसूद, बाबर आजम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आघा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, अब्रार अहमद, नसीम शाह, मीर हम्झा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.