Rishabh Pant No Look Shot copied by pakistani player Saim Ayub: भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत नेहमीच 'नो लुक शॉट' खेळताना पहायला मिळतो. पंत हा शॉट खेळताना यशस्वी देखील ठरतो. आता त्याचप्रकारचा शॉट खेळताना एका पाकिस्तानी फलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण यामुळे तो ट्रोल होत आहे.
जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये पाकिस्तानी युवा खेळाडू सईम अयूब पंतची कॉपी करताना दिसत आहे. अयूबने न पाहता शॉट मारला खरा, पण चेंडू सरळ फिल्डरच्या हातात गेला आणि अयूबला झेलबाद होऊन परतावे लागले. आयूबच्या या अयशस्वी फटक्यामुळे आयूबला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
पाकिस्तानातील फैसलाबादमधील इकबाल स्टेडीयमवर चॅम्पियन्स कप स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेमध्ये डॉल्फिन्स संघाविरूद्धच्या सामन्यात सईम अयूब पँथर्स संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. सामन्यामध्ये अयूब ६ धावांवर खेळत होता.
गोलंदाज हमझाच्या चेंडूवर अयूबने न पाहता साईड फ्लिक करत षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू सरळ फिल्डरच्या हातात गेल्याने अयूबला ६ धावांवर माघारी परतावे लागले.
प्रथम फलंदाजीसाठी पँथर्सला डॉल्फिन्सच्या मीर हमझाने सुरूवातीच्या ५ षटकांमध्येच सईम व अब्दुलच्या रूपाने २ झटके दिले. परंतु पुढे फलंदाजीसाठी आलेल्या उस्मान खानने १११ धावांची शतकीय खेळी केली. त्याला हैदर अली (६३*) व शादाब खान (६५*) यांच्या अर्धशतकीय खेळीची साथ मिळाली आणि पँथर्सची धावसंख्या ३२८ धावांवर पोहोचली.
पँथर्सने दिलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डॉल्फिन्सची खेळी २७८ धावांवर आटपली. सामन्यामध्ये पँथर्सच्या मोहम्मद हसनेनला डॉल्फिन्सचे ५ विकेट्स घेण्यात यश आले. सामन्यादरम्यान साहीबझादा फरहान (५२*) क्वासिम अक्रमने (६५*) धावांची खेळी केली. परंतु पँथर्सच्या फलंदाजांना २७८ धावांवर रोखत डॉल्फिन्सविरूद्ध ५० धावांनी विजय मिळवला.
रिषभ पंत अनेकदा हा शॉट अगदी सहजरीत्या लगावतो. दुर्घटनेनंतर परतलेल्या रिषभ पंतने २०२४ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये ह्या शॉटने षटकार लगावला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानने देखील त्याच्या या शॉटचे कौतुक केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.