Captain Mohammad Rizwan resting : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे मालिका जिंकली. त्यानंतर त्याच्याकडून ट्वेंटी-२० मालिकेतही तशाच यशाची अपेक्षा होती, परंतु पाकिस्तानला सपशेल अपयश आले. पाकिस्तानला पहिल्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला आणि आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात त्यांच्यावर व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्याचे आव्हान आहे. पण, त्यांनी या सामन्यापूर्वी कर्णधार मोहम्मद रिझवान याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सलमान अली आघा ( Salman Ali agha) हा पाकिस्तान संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.