PAK vs ENG: इंग्लडने सामन्यात घेतली पाकिस्तानला न झेपणारी आघाडी; फलंदाजांनी केली इंग्लंडची नौका पार

PAK vs ENG: पाकिस्तानने चौथ्या दिवसाअखेरीस ६ विकेट्स गमावत १५६ धावा लावल्या आणि इंग्लंडने ११६ धावांनी आघाडी घेतली आहे.
PAK VS ENG
PAK VS ENGesakal
Updated on

PAK vs ENG Day 4: इंग्लंडविरूद्ध कसोटी पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५५६ धावा उभारूनही पाकिस्तानला सामन्यात पिछाडीवर जावे लागले आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडला सामन्यात पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंड पहिल्या डावात ७ विकेट्स गमावत तब्बल ८२३ धावा उभारल्या. तर पाकिस्तानने चौथ्या दिवसाअखेरीस ६ विकेट्स गमावत १५६ धावा धावफळकावर लावल्या आणि इंग्लंडने ११६ धावांनी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्ताने घरच्या मैदानावर चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानच्या एकूण ३ फलंदाजांनी पहिल्या डावात शतक लगावले. सलामीवीर अब्दुला शफीक (१०२), कर्णधार शान (१५५), सलमान अली अघा (१०४) धावा पूर्ण करत शतक ठोकले. या तिघांच्या शतकामुळे व साउद शकीलच्या ८२ धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा टप्पा गाठला.

PAK VS ENG
PAK vs ENG 1st Test: पाकिस्तानच्या ६ गोलंदाजांची 'Century'! इंग्लंडसमोर लाचारी,ही तर झिम्बाब्वेपेक्षा बेक्कार कामगिरी

प्रत्युत्तरात पाकिस्तानी गोलंदाजांचा हैरान करून सोडले. कर्णधार ऑली पोप वगळता इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी सामन्यात पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर आघाडी घेतली. झॅक क्रॉली (७८) फलंदाजीला सुंदर सुरूवात केली. बेन डकेटने इंग्लंडच्या धावासंख्येत (८४) धावांचे योगदान दिले. जो रूटने डावात १७ चौकारांसह विक्रमीय द्विशतक झळकावले. तर हॅरी ब्रूकने ३१७ धावा करत आपल्या कारकीर्दितली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी पूर्ण केली. चौथ्या दिवसातील दुपारच्या सत्रात ७ बाद ८२३ अशी धावसंख्या असताना इंग्लंडने डाव जाहीर केला.

दुपारच्या सत्रात फलंदाजीसाठी आलेल्या निम्मा पाकिस्तान संघ इंग्लंडने माघारी पाठवला आहे. पाकिस्तानने चौथ्या दिवसाअखेरीस ६ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील शतकवीर सलमान अली अघा ४१ धावांवर खेळत आहे. तर आमिर जमाल २७ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडे ११६ धावांची आघाडी असून अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.