PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Babar Azam Drop From Pakistan Squad: बाबर आझमला संघातून वगळल्यानंतर त्याच्या जागी संघामध्ये संधी मिळालेल्या कामरान घुलामने संधीचे सोने केले आणि पदार्पणाच्या पहिल्याच डावात शतक झळकावले.
saim ayub and kamran ghulam
saim ayub and kamran ghulamesakal
Updated on

PAK vs ENG 2nd Test: इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५०० धावा उभारून देखील पाकिस्तानला सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. पाकिस्तान-इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यला आजपासून मुल्तान येथे सुरूवात झाली आहे. पाकिस्तानने पहिल्या दिवसाअंती सामन्यात ५ विकेट गमावत २५९ धावसंख्या धावफलकावर लावल्या आहेत.

पाकिस्तानने यावेळीही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तान १५ धावांवर खेळत असताना इंग्लंडने पहिल्या सामन्यातील शतकवीर अब्दुला शफिकला (७) माघारी पाठवले. परंतु मागच्या सामन्यात अवघ्या (४) धावांवर बाद झालेल्या युवा सईम अयुबने (७७) धावांची अर्धशतकीय खेळी केली.

saim ayub and kamran ghulam
PAK vs ENG 2nd Test : कोण आहे Kamran Ghulam? पहिल्याच कसोटीत Century अन् Babar Azam च्या स्थानाला दिले आव्हान

पहिल्या सामन्यात १५१ धावा करणारा कर्णधार शान मसूद (३) यावेळी स्वस्तात परतला. तर बावरच्या जागी संघामध्ये आलेल्या कामरान घुलाम याने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. कामरान घुलाम ११ चौकार व १ षटकारासह ११८ धावा करत शतक झळकावले. सईम अयुब व कामरान घुलाम या नव्या फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला.

पाकिस्तानची पहिल्या दिवसाअंती ५ बाद २५९ अशी धावसंख्या झाली असून मोहम्मद रिझवान(३७) व सलमान अघा (५) धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडच्या जॅक लिचने सामन्यात २ विकेट्स घेतले. तर, मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स व शोईब बशीरने प्रत्येकी १ विकेट्स घेतला.

saim ayub and kamran ghulam
खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.