Champions Trophy 2025: पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे, आणि या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषवणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा दावा काही अहवालात करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे ठिकाण बदलण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. ही स्पर्धा हायब्रीड' मॉडेल पद्धतीने आयोजित करण्याची विनंतीही मंडळाने केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपले सामने पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात खेळू शकतो. दरम्यान पीसीबीने बीसीसीआयला धमकी दिली आहे.
पीसीबीच्या म्हणण्यानुसार, जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानला आला नाही, तर पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकेल.
जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करत नसेल तर पाकिस्तान 2026 मध्ये भारताचा दौरा करणार नाही. आयसीसीची वार्षिक परिषद 19 ते 22 जुलै दरम्यान कोलंबो येथे होणार आहे. यावेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रीड मॉडेलच्या कोणत्याही योजनेला विरोध करेल.
आशिया कपसाठी भारतीय संघ 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. यानंतर द्विपक्षीय मालिकाही रद्द करण्यात आली.
तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कप स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळण्याची परवानगी देऊन आयसीसीला हायब्रीड मॉडेल लागू करण्याची विनंती करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
आशिया कप 2023 मध्ये असेच काहीसे दिसले, जेव्हा भारताने आपले सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत तटस्थ ठिकाणी खेळले होते. या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्यात आले. कोलंबो येथे होणाऱ्या आयसीसीच्या आगामी वार्षिक परिषदेत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.