PAK vs BAN 1st Test: रिझवान-शकीलचा बांगलादेशला शतकी दणका! रिषभ पंतचा विक्रमही मोडला

Saud Shakeel-Mohammad Rizwan Century: पाकिस्तानकडून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतके करत विक्रम केले.
Saud Shakeel-Mohammad Rizwan
Saud Shakeel-Mohammad RizwanSakal
Updated on

Pakistan vs Bangladesh, 1st Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीला बुधवारपासून सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात भक्कम सुरुवात केली आहे. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतके केली.

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर शकील ५७ धावांवर नाबाद होता, तर रिझवान २४ धावांवर नाबाद होता. त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी शानदार सुरुवात करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करायला लावला. या दोघांनीही एकमेकांना उत्तम साथ देत एकेरी-दुहेरी धावा काढण्याबरोबरच खराब चेंडूंचाही खरपूस समाचार घेतला.

Saud Shakeel-Mohammad Rizwan
PAK vs BAN: पाकिस्तानच्या कर्णधाराच्या विकेटवरून मोठा वाद, अंपायरबरोबरही बाचाबाची; पाहा Video

दरम्यान, पहिले सत्र पूर्ण खेळून काढल्यानंतर दुसऱ्या सत्रात दोघांनीही शतके पूर्ण केली. त्यानंतरही ते दोघे चांगला खेळ करत होते. अखेर त्या दोघांमध्ये झालेली २४० धावांची भागीदारी मेहदी हसन मिराझने तोडली. त्याने शकिलला बाद केले. शकिलने २६१ चेंडूत ९ चौकारांसह १४१ धावांची खेळी केली.

पण त्यानंतरही रिझवान चांगला खेळत होता. पण ११३ व्या षटकानंतर ६ बाद ४४८ धावा असताना पाकिस्तानने पहिला डाव घोषित केला. त्यावेळी रिझवान २३९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १७१ धावांवर नाबाद राहिला. तसेच शाहिन आफ्रिदी २९ धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान शकिल आण रिझवान यांच्यात झालेली २४० धावांची भागीदारी ही कसोटीत पाकिस्तानकडून पाचव्या विकेटसाठी झालेली पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

पाकिस्तानसाठी कसोटीत ५ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

  • २८१ धावा - असिफ इक्बाल - जावेद मियाँदाद, लाहोर, १९७६

  • २५९ धावा - युनूस खान - असद शाफिक, चितगाव, २०११

  • २५८ धावा - इंझमाम-उल-हक - सलीम मलिक, वेलिंग्टन, १९९४

  • २४८ धावा - शोएब मलिक - असद शफिक, अबुधाबी, २०१५

  • २४० धावा - सौद शकील - मोहम्मद रिझवान, रावळपिंडी, २०२४

Saud Shakeel-Mohammad Rizwan
PAK vs BAN: घरातही 'डक'! बाबर आझम भोपळाही न फोडता आऊट अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

शकील - रिझवानचे विक्रम

शकील हा पाकिस्तानसाठी कारकिर्दीतील पहिल्या ११ कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या शतकी खेळीदरम्यान ११०८ धावा पूर्ण केल्या. हा त्याचा ११ वा सामना आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी पहिल्या ११ सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शकीलने सईद अहमदला मागे टाकले आहे. त्याने ११ सामन्यांत १०४१ धावा केल्या होत्या.

दरम्यान, बांगलादेश आणि पाकिस्तान संघात खेळवण्यात येणारी मालिका ही जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे.

त्यामुळे आता जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये रिझवान अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने याबाबत ऋषभ पंतला मागे टाकले आहे. रिझवानचे आता २७ सामन्यांतील ४४ डावात १६५८ धावा झाल्या आहेत. पंतच्या २४ सामन्यांत १५७५ धावा आहेत.

असं असलं तरी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये पंतच अव्वल क्रमांकावर आहे. त्याने १२ वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे. तसेच रिझवानने ११ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.