PAK vs BAN, 2nd Test: लिटन दासच्या शतकानं पाकिस्तानला दमवलं, शाहजाद खुर्रमच्या ६ विकेट्सच्या मेहनतीवर पाणी फिरवलं

Litton Das Century after Khurram Shahzad 6 Wickets: बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या शाहजाद खुर्रमने ६ विकेट्स घेतल्या, पण त्याच्या कामगिरीला लिटन दासच्या शतकाने झाकोळलं.
Litton Das Century after Khurram Shahzad 6 Wickets | Pakistan vs Bangladesh
Litton Das Century after Khurram Shahzad 6 Wickets | Pakistan vs BangladeshSakal
Updated on

Pakistan vs Bangladesh, 2nd Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना रावळपिंडी येथे सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघात रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. सामन्याचा तिसरा दिवस दोन्ही संघांसाठी चढ-उताराचा राहिला. तरी हा दिवस पाकिस्तानसाठी आधी शाहजाद खुर्रमने गाजवला आणि त्यानंतर लिटन दास आणि मेहदी हसन मिराजने गाजवला.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी बांगलादेशने पहिल्या डावाच तिसऱ्या षटकापासून आणि १० धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या खुर्रमने आपल्या गोलंदाजीने बांगलादेशवर वर्चस्व ठेवले होते.

त्याने सुरुवातीला अवघ्या पाच चेंडूत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशची अवस्था एका क्षणी २६ धावांवर ६ विकेट्स अशी झाली होती. त्यामुळे पाकिस्तानला सामन्यावर पकड मजबूत करण्याची मोठी संधी होती.

Litton Das Century after Khurram Shahzad 6 Wickets | Pakistan vs Bangladesh
PAK vs BAN: पाकिस्तानची ढिसाळ फिल्डिंग पुन्हा दिसली! तिघांनी प्रयत्न करूनही पहिल्याच चेंडूवर सोपा झेल सुटला, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.