PAK vs ENG 1st Test: Harry Brook चे द्विशतक अन् Joe Root २५० पार; इंग्लंडच्या ६७६ + धावा, पाकिस्तानी रडले ना भावा

PAK vs ENG 1st Test : मुलतान कसोटीच्या सपाट खेळपट्टीवर इंग्लंडच्या जो रूट व हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात ३ बाद ६७६ धावा करून १२० धावांची आघाडी घेतली आहे.
Harry Brook double century
Harry Brook double centuryesakal
Updated on

PAK vs ENG 1st Test Harry Brook double century: पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना जो रूट व हॅरी ब्रूक या दोघांनी द्विशतकीय खेळी केली. पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ६७६ धावा उभ्या करून १२० धावांची आघाडी घेतली आहे. जो रूट व Harry Brook मैदानावर उभे राहिले आणि अनेक विक्रम नोंदवले.

जो रूटने इंग्लंडच्या डावाला खरा आकार दिला. त्याने झॅक क्रॉली ( ७८) यांनी १०९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रूट व बेन डकेट ( ८४) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या. रूटने कसोटीतील सहावे द्विशतक झळकावताना इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. त्यापाठोपाठ ब्रूकने कसोटीतील त्याचे पहिले द्विशतक पूर्ण केले. चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा रूट ३६८ चेंडूंत १७ चौकारांसह २५९ धावांवर आणि हॅरी ब्रूक २५७ चेंडूंत २० चौकार व १ षटकारासह २१८ धावांवर खेळतोय आणि इंग्लंडने ३ बाद ६५६ धावा करून १०२ धावांची आघाडी घेतली आहे.

Harry Brook double century
PAK vs ENG : Joe Root ची डबल सेन्च्युरी, हॅरी ब्रूकने केली पाकिस्तानची धुलाई; राहुल द्रविडचा विक्रम मोडला अन् वीरूशी केली बरोबरी
  • हॅरी ब्रूक हा इंग्लंडकडून घरच्या मैदानाबाहेर द्विशतक झळकावणारा चौथा युवा फलंदाज ठरला. बिल एडरीच ( २२ वर्ष व ३४२ दिवस) , बेन स्टोक्स ( २४ वर्ष व २१२ दिवस) आणि वॅली हॅमोंड ( २५ वर्ष व १७८ दिवस) हे ब्रूकच्या ( २५ वर्ष व २३१ दिवस) पुढे आहेत.

  • इंग्लंडसाठी एकाच कसोटीत दोन फलंदाजांनी एकाच इनिंग्जमध्ये द्विशतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९८५ मध्ये भारताविरुद्ध ग्रॅमी पॉलर ( २०१) व माइक माइक गॅटींग ( २०७) यांनी चेन्नई कसोटीत असा पराक्रम केला होता.

  • पाकिस्तानविरुद्धच्या या कसोटीत जो रूट व हॅरी ब्रूक यांनी आतापर्यंत ४१२ धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी २०२० मध्ये जॉस बटलर व झॅक क्रॉली यांनी साऊथहॅम्टन कसोटीत ३५९ धावा केल्या होत्या. स्टुअर ब्रॉड व जॉनथन ट्रॉट यांनी २०१० मध्ये लॉर्ड कसोटीत ३३२ धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेट्स)
427* - जो रूट आणि हॅरी ब्रूक वि. पाकिस्तान, मुलतान, 2024*
411 - कॉलिन काउड्री आणि पीटर मे वि. वेस्ट इंडिज, बर्मिंगहॅम, 1957
399 - जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स वि. दक्षिण आफ्रिका, केप टाउन, 2016
392 - लिओनार्ड हटन आणि मॉरिस लेलँड वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, 1938

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.