पाकिस्तानची वाट लावली! Harry Brook चे त्रिशतक, जो रूटसह मोडला ९० वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंड ७९० पार

PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने मुलतान कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ६ बाद ७९७ धावांच्या पुढे धावा केल्या. जो रूटने कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली आणि Harry Brookने त्रिशतक झळकावले आहे.
PAK vs ENG 1st Test Harry Brook Triple century
PAK vs ENG 1st Test Harry Brook Triple centuryesakal
Updated on

PAK vs ENG 1st Test Harry Brook Triple century: इंग्लंडने पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या गोलंदाजांची पार वाट लावली आहे. ५५६ धावा चोपल्यानंतर निर्धास्त झालेल्या पाकिस्तानची जो रूट व हॅरी ब्रूक या जोडीने झोप उडवली. जो रूट ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावांवर माघारी परतला. ही त्याची कसोटी कारकीर्दितली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रूट बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूकने मोर्चा सांभाळला आणि कसोटीतील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर केले. हॅरी ब्रूकने ३२२ चेंडूंत २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावा चोपल्या.

जो रूटने दुसऱ्या विकेटसाठी झॅक क्रॉलीसह ( ७८) १०९ धावांची आणि बेन डकेट ( ८४)सह तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावा जोडल्या. रूट व ब्रूक ही जोडी खेळपट्टीवर चांगलीच जमली. रूट व ब्रूक या जोडीने ५५२ चेंडूंत ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. घरापासून दूर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम डॉन ब्रॅडमन व बिली पोनस्पोर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध १९३४ मध्ये ४५१ धावा करून नोंदवला होता. ९० वर्षांपूर्वीचा विक्रम आज रूट व ब्रूक या जोडीने तोडला. श्रीलंकेच्या मार्वन अटापट्टू व कुमार संगकारा यांनी २००४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ४३८ धावा केल्या होत्या.

हॅरी ब्रूकने त्याच्या कसोटीतील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रूपांतर केले. त्याने ३१० चेंडूंत २८ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने त्रिशतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे वेगवान तिहेरी शतक ठरले. वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूंत तिहेरी शतक झळकावले होते. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तिहेरी शतक झळकावता आले आहे आणि १९९० नंतर ( ग्रॅमम गूच) हे इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेले पहिले तिहेरी शतक ठरले.

इंग्लंडकडून चौथ्या विकेटसाठी ४५२ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे. २०१५ मध्ये शॉन मार्श व अॅडम व्होग्सने वेस्ट इंडिजविरुद्ध ४४९ धावांची भागीदारी केली होती. रूटने आज २६२ धावा केल्या आणि ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये त्यानेप पाकिस्तानविरुद्ध मँचेस्टर कसोटीत २३४ धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.