PAK vs ENG : इंग्लंडने इतिहास रचला, पाकिस्तानचा पार कचरा केला! Multan Test मध्ये विक्रमांचा पाऊस पडला

PAK vs ENG 1st Test records : पाकिस्तानची घरच्या मैदानावरील लाजीरवाणी कामगिरीची मालिका कायम राहिली. मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानचा संघ डावाने हरला. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करूनही डावाने पराभूत होणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला.
ENG vs PAK
ENG vs PAK esakal
Updated on

Pakistan vs England 1st Test Records Stats : इंग्लंडने मुलतान कसोटी एक डाव व ४७ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ७ बाद ८२३ धावांवर डाव घोषित केला. जो रूट ( २६२) आणि हॅरी ब्रूक (३१७) यांनी ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. २६७ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांवर गडगडला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा तरीही डावाने पराभव

  • ५५६ - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४ ( एक डाव व ४७ धावा)

  • ४९२ - आयर्लंड वि. श्रीलंका, गॅले, २०२३ ( एक डाव व १० धावा)

  • ४७७ - इंग्लंड वि. भारत, चेन्नई, २०१६ ( एक डाव व ७५ धावा)

  • ४६३ - वेस्ट इंडिज वि. भारत, कोलकाता, २०११ ( एक डाव व १५ धावा)

  • ४५९ - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०१० ( एक डाव व २५ धावा)

ENG vs PAK
WTC 2023-25 Final : पाकिस्तान संघावर दुहेरी संकट; इंग्लंडकडून हरले अन् भारताला टक्कर देण्याचे स्वप्नही भंगले

प्रथम फलंदाजी करून सर्वाधिक धावा करूनही हरणारे संघ

  • ८ बाद ५९५ डाव घोषित - बांगलादेश वि. न्यूझीलंड, वेलिंग्डन, २०१७

  • ५८६ धावा - ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, सिडनी, १८९४

  • ५५६ धावा - ऑस्ट्रेलिया वि. भारत, एडिलेड, २००३

  • ५५६ धावा - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४

  • ५५३ धावा - न्यूझीलंड वि. इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०२२

डावात ३ शतकं तरीही कसोटीत पराभव

  • ३ - श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया, कोलंबो, १९९२

  • ३ - पाकिस्तान वि. इंग्लंड, रावळपिंडी, २०२२

  • ३ - पाकिस्तान वि. इंग्लंड, मुलतान, २०२४

पहिल्या डावात ५०० प्लस धावा करूनही सर्वाधिक पराभव

  • ५ - पाकिस्तान

  • ३ - ऑस्ट्रेलिया

  • २ - इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड

ENG vs PAK
ENG vs PAK esakal
  • कसोटीच्या पहिल्या डावात ५०० धावा स्वीकारूनही इंग्लंडने कसोटीत ९ विजय मिळवले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ६) चा क्रमांक येतो.

घरच्या मैदानावरील पाकिस्तानचा मोठा पराभव

  • एक डाव व १५६ धावा वि. वेस्ट इंडिज, लाहोर १९५९

  • एक डाव व १३१ धावा वि. भारत, रावळपिंडी २००४

  • एक डाव व ९९ धावा वि. ऑस्ट्रेलिया, रावळपिंडी १९९८

    एक डाव व ५२ धावा वि. भारत, मुलतान २००४

  • एक डाव व ४७ धावा वि. इंग्लंड, मुलतान २०२४

आशिया खंडात इंग्लंडने डावाने मिळवलेले विजय

  • एक डाव व २५ धावा वि. भारत, दिल्ली १९७६

  • एक डाव व ४७ धावा वि. पाकिस्तान, मुलतान २०२४

पाकिस्तानची घरच्या मैदानावरील विजयहीन मालिका

  • ११ - मार्च २०२२ ते आतापर्यंत ( ७ पराभव व ४ ड्रॉ)

  • ११ - फेब्रुवारी १९६९ ते मार्च १९७५ ( १ पराभव व १० ड्रॉ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.