PAK vs ENG, 2nd Test: पाकिस्तानविरुद्ध बेन डकेटचं वादळी शतक, पण इंग्लंडला शेवटी धक्के; १५ धावांत गमावल्या ४ विकेट्स

Pakistan vs England, 2nd Test: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बेन डकेटने आक्रमक शतक केलं, पण तरी इंग्लंड दुसऱ्या दिवस अखेर १२७ धावांनी पिछाडीवर आहे.
Ben Duckett
Ben Duckett
Updated on

Pakistan vs England Test: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारपासून मुलतान येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने पहिल्या डावात ५३ षटकात ६ बाद २३९ धावा केल्या आहेत. अद्याप इंग्लंड संघ १२७ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने पहिल्या डावात ९१ षटकापासून ५ बाद २५९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी मोहम्मद रिझवान आणि आगा सलमान फलंदाजी करत होते.

मात्र रिझवान ९३ व्या षटकातच ४१ धावांवर बाद झाला, तर आगा सलमान १०१ व्या षटकात ३१ धावांवर बाद झाला. अखेरीस अमीर जमाल आणि नोमन अली यांनी छोटेखानी चांगली खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला साडेतीनशे धावांचा टप्पा पार करता आला. अमीर जमालने ३७ धावा केल्या, तर नोमन अलीने ३२ धावा केल्या.

Ben Duckett
PAK vs ENG 2nd Test : पाकिस्तानचा डाव गडगडला, १०७ धावांवर उर्वरित संघ इंग्लंडने माघारी पाठवला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.