Pakistan playing 11 For 3rd Test against Engalnd: पाकिस्तानविरूद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापसून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांचा या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. तर , दुसरा सामना पाकिस्तानने जिंकून मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत असल्यामुळे शेवटचा सामना निर्णायक सामना ठरणार आहे. उद्याच्या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला असून संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा सामना रावळपिंडी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार असल्यामुळे या मैदानावरील संथ खेळपट्टीवर फिरकीटूंना मदत मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये ३-३ फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारून पराभव झाल्यनंतर पाकिस्तानने संघात बदल केला होता. माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व नसीम शाहला पाकिस्तान निवड समितीकडून संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याबदली नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. या सर्व नव्या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने केले. संघात बाबर आझमच्या जागी खेळणाऱ्या कामरान घुलामने पदार्पणाच्या पहिल्याच डावात शतक झळकावले व बाबर आझमच्या संघातील स्ठानाला आव्हान दिले आहे.
दुसऱ्या सामन्यातील चांगल्या सांघिक कामगिरीमुळे पाकिस्तानने संघात बदल केलेला नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत पाकिस्तान आठव्या स्थानी आहे. तर, न्यूझीलंडने भारताविरूद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंड पाचव्या स्थानी घसरला आहे.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन :
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, रेहान अहमद, गस अटकिंसन, जॅक लीच, शोएब बशीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.