खेळाडूंनी MS Dhoni कडून बरंच काही शिकायला हवं; पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक अन् गौतम गंभीरबद्दल म्हणाला...

Kamran Akmal praised MS Dhoni: माजी पाकिस्तानी यष्टिरक्षक कामरान अकमलने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि खेळाडूंनी त्याच्याकडून शिकले पाहिजे असा युवा खेळाडूंना सल्लाही दिला.
Gautam gambhir and Kamran Akmal
Gautam gambhir and Kamran Akmalesakal
Updated on

India vs Pakistan: भारतविरुद्ध पाकिस्तान सामना हा नेहमीच भावनिक आणि प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अनेकदा आपल्याला शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळते. अनेक सामन्यांमध्ये भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी पाकिस्तानी यष्टिरक्षक कामरान अकमल यांच्यात वाद झाल्याचे दिसले आहे. नुकत्याच झालेल्या संवादात कामरान अकमल यांनी गौतम गंभीर माझा चांगला मित्र आहे, असा खुलासा केला. यावेळी त्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेही देखील कौतुक केले.

नुकतीच बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका भारताने जिंकली. गौतम गंभीरची भारतीय मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर ही पहिलीच कसोटी मालिका होती. गौतम गंभीरच्या या पहिल्या कसोटी मालिकेतील यशाबद्दल गंभीरचे अभिनंदन करण्याची इच्छा कामरान अकमलने व्यक्त केली आहे.

Gautam gambhir and Kamran Akmal
Virender Sehwag Son: भले शाब्बास! सेहवागच्या लेकाने गाजवला पदार्पणाचा सामना, दिल्लीला मिळवून दिला शानदार विजय

गंभीर-अकमल या वादावर बोलताना अकमल म्हणाला," गौतम गंभीर आणि मी चांगले मित्र आहोत. माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. तो माझ्या भावासारखा आहे. नुकतीच गौतमने प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकल्याबद्दल मी गौतमचे अभिनंदन करू इच्छितो. त्याच्या या विजयाबद्दल मी आनंदी आहे,”

कामरानने या संवादादरम्यान भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीवरही कौतुकाचा वर्षाव केला. अकमल म्हणाला, खेळाडूंनी एमएस धोनीकडून शिकले पाहिजे. एमएस धोनी पूर्णपणे भिन्न मानसिकता असलेला, एक परिपूर्ण कर्णधार आहे आणि त्याचा स्वभाव खूप शांत आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द विलक्षण होती. आम्ही विकेटकीपिंगबद्दल खूप चर्चा करायचो, फलंदाजीबद्दलही बोलायचो.

Gautam gambhir and Kamran Akmal
Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

"आजही मी किंवा कोणताही खेळाडू धोनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा दौऱ्यांदरम्यान भेटतो तेव्हा त्याच्याकडून सल्ला घेतो. त्याला क्रिकेटबाबत शंका विचारतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते. युवा खेळाडूंनीही त्याच्याकडून सल्ला घ्यावा. कारण तो एक वरिष्ठ आणि महान खेळाडू आहे. भारताच्या महान कर्णधाराशी बोलायला मला आवडते." तो पुढे म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()