सूर्याच्या कॅचची कॉपी करायला गेला अन् पाकिस्तानी खेळाडू फसला, पाहा Viral Video

Saim Ayub failed to grab catch: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला होता. आता त्याच्याच या झेल सारखा झेल घेण्याचा प्रयत्न एका पाकिस्तानच्या साईम आयुबनेही केला, पण त्याचा हा प्रयत्न फसला.
Suryakumar Yadav |  Saim Ayub
Suryakumar Yadav | Saim AyubSakal
Updated on

Suryakumar Yadav Catch: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईन जवळ अफलातून झेल घेतला होता.

त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवत हा झेल घेतला होता. त्याचा हा झेल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. त्यानंतर भारताने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.

आता त्याच्याच या झेल सारखा झेल घेण्याचा प्रयत्न एका पाकिस्तानच्या साईम आयुबनेही केला, पण त्याचा हा प्रयत्न फसला. सध्या पाकिस्तानमध्ये देशांतर्गत स्पर्धा चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आयुब पँथर्स पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Suryakumar Yadav |  Saim Ayub
नीरज चोप्राची परदेशातही क्रेझ! Selfi साठी तरुणींची गर्दी Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.