बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर Mohammad Rizwan ची पाकिस्तानच्या कर्णधारपदी निवड

AUS vs PAK ODI Series : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद रिझवानची निवड करण्यात आली आहे.
mohammad rizwan
mohammad rizwanesakal
Updated on

Mohammad Rizwan Pakistan New Captain : ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाकिस्तान वन-डे मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिकाअसून पहिला सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघाची घोषणा झाली व पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानवर सोपवण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वी माजी कर्णधार बाबर आझमने सर्व फॉरम्याटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले. बाबरच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण असेल? असा पाकिस्तानी चाहत्यांना प्रश्न पडला होता. मोहम्मद रिझवान संघातील अनुभवी खेळाडू असल्याने त्याला कर्णधार करण्यात यावे, असे काही पाकिस्तानी माजी खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुचवले होते.

mohammad rizwan
इंग्लंडकडून Babar Azam चा सन्मान! वर्ल्ड कप २०२२ मध्ये वापरलेली बॅट एमसीजीमध्ये प्रदर्शनात दिसणार

शान मसुदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केली आणि त्यामध्ये कर्णधारपद अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवानकडे सोपवले. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून सुरू असलेल्या गोंधळाला पुर्णविराम लागला आहे. तरीही ट्वेंटी-२० कर्णधारपद शाहीन आफ्रिदीकडून काढून घेण्यात आले होते व पुन्हा बाबर आझमकडे सोपवण्यात आले होते. पण, बाबरच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान संघातील ट्वेंटी-२० कर्णधारपदाचा निर्णय अजून झालेला नाही.

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत खराब फॉर्ममुळे वगळण्यात आलेल्या बाबर आझम, शाहीन आफ्रिदी व नसीम शाहला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डे मालिकेतील संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तान

अब्दुल्ला शफीक, सईम अयुब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक - कर्णधार), कामरान घुलाम, सलमान अघा, अमीर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसीबुल्ला खान, इरफान खान .

ऑस्ट्रेलिया

जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड, कूपर कॉनोली, सीन ॲबॉट, मार्कस स्टॉयनिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.