Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला अजून वर्षभर तरी अवकाश आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही या प्रश्नामुळे पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी यांची झोप उडाल्याचे दिसून येत आहे.
पीसीबी चेअरमन आतापासूनच चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातून हलवण्यात येऊ नये यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या वक्तव्यानुसार पाकिस्तान हे दुसऱ्या ठिकाणी चॅम्पयन्स ट्रॉफी शिफ्ट करण्याचा विचार देखील करत नाहीये. पीएसएल फायनल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नक्वी म्हणाले की, दुबईत गेल्या आठवड्यात झालेल्या आयसीसी बैठकीवेळी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याशी चर्चा झाली होती.
नक्वी म्हणाले की, 'होय आम्ही दोघे बराच काळ बोलत होतो. मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाली. मात्र चर्चेदरम्यान काय काय झालं हे उघड करणं योग्य ठरणार नाही.' याचवेळी नक्वींना भारत पाकिस्तानात येण्यास नकार देणार का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मी या बाबत साधा विचार देखील करत नाहीये. आम्ही पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू याबाबत आम्हाला विश्वास आहे.'
नक्वी यांनी पाकिस्तानमधील तीन स्टेडियमचे नुतनीकरण करण्याबाबत देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याबाबत प्लॅन केला आहे. तीन स्टेडियमचे नुतनीकरण करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. यामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये एक वेगळाच अनुभव येईल.'
भारताने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा करण्याचे टाळले आहे. भारताने 2008 मध्ये पाकिस्तानचा शेवटाच दौरा केला होता. त्यावेळी आशिया कप पाकिस्तानमध्ये झाला होता. भारताने गेल्या वर्षी देखील आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.