Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

 Moshin Naqvi
Pakistan Cricket Team Moshin Naqviesakal
Updated on

Pakistan Cricket Team Moshin Naqvi : पाकिस्तान क्रिकेट संघाने आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या ऐतिहासिक पराभवानंतर मालिका 2 - 1 अशी जिंकली. सहसा चांगले संघ आयर्लंडविरूद्धची मालिकेत व्हाईट वॉश मिळवतात. भारताच्या तिसऱ्या फळीतील संघ देखील आयर्लंडला व्हाईट वॉश देतो तिथं पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका 2 - 1 अशी जिंकल्यावर शेखी मिरवली. पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा सध्याचा संघ हा जगात सर्वोत्तम असल्याचा बडेजावपणा करणारं वक्तव्य केलं.

 Moshin Naqvi
IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

आयसीसी टी 20 वर्ल्डकपूर्वी पाकिस्तानचा संघ आयर्लंडविरूद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळली आहे. यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरूद्ध देखील 4 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.

दरम्यान, नक्वींनी आयर्लंडविरूद्धच्या मालिका विजयानंतर पाकिस्तान संघाचे तोंडभरून कौतुक केलं. नक्वींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, 'आयर्लंडविरूद्धची मालिका जिंकल्याबद्दल पाकिस्तान संघाचं अभिनंदन. सांघिक कामगिरी आणि डेडिकेशनमुळे तुम्ही सिद्ध करून दाखवलं की तुम्ही जगातील सर्वोत्तम टीम आहोत. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी आणि वर्ल्डकपसाठी शुभेच्छा.'

 Moshin Naqvi
IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

मोहसीन नक्वी हे देखील पाकिस्तान संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर गेले होते. ते आता मायदेशी परतले आहेत. नक्वी यांनी आयर्लंड क्रिकेट बोर्डासोबत एफटीबी बाबत देखील चर्चा केली. आयर्लंड पाकिस्तानसोबत 2023-27 या एफटीबी सायकलमध्ये आधीच तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.