Shaheen Afridi : टी20 वर्ल्डकपच्या तोंडावर शाहीननं 'उप'कर्णधारपद नाकरलं? पीसीबीची सारवासारव करताना पळता भुई थोडी
Shaheen Afridi Vice Captaincy Controversy : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच आपला टी 20 वर्ल्डकप संघ घोषित करण्यासाठी प्रचंड वेळ खाल्ला. त्यानंतर त्यांनी संघ जाहीर केला अन् एका नव्या वादाचा जन्म झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचा उपकर्णधार कोण हे न सांगताच संघाची घोषणा केली.
दरम्यान, पाकिस्तानचा उपकर्णधार पदाचा दावेदार शाहीन आफ्रिदीने टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये पाकिस्तानचे उपकर्णधारपद भुषवण्यास नकार दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखं परसलं. त्यानंतर आता पीसीबीची यावर स्पष्टीकरण देताना तारांबळ उडताना दिसत आहे.
शाहीनने खरंच नाकारलं उपकर्णधारपद?
पाकिस्तानमधील अनेक वृत्तसंस्थांनी शाहून आफ्रिदीनेच उपकर्णधारपद नाकारल्याचा दावा केला. त्याने बाबर आझमचा डेप्युटी होण्यास नकार दिल्याचा या वृत्तासंस्थांचा दावा आहे. मात्र पासीबीने यावर सारवासारव करताना सांगितले की राष्ट्रीय संघाच्या निवडसमितीने कधीही अधिकृतरित्या उपकर्णधारपद शाहीनला ऑफरच केलं नव्हतं.
पाकिस्तान संघ उपकर्णधाराविनाच
पाकिस्तानच्या एका निवडसमिती सदस्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, निवडसमिती आणि क्रिकेट बोर्डाच्या ऑनलाईन मिटिंगचा सर्व फोकस हा संघाच्या निवडीवर होता. पीटीआने सांगितले की, 'सातपैकी सहा निवडसमिती सदस्य हे संघाला उपकर्णधाराची गरज नसल्याचे मत नोंदवत होते. त्यामुळे बैठकीत उपकर्णधारपदाबाबत चर्चाच झालेली नाही.
सूत्रांनी पुढे सांगितले की एका निवडसमिती सदस्याने आफ्रिदीसोबत मार्चमध्ये उपकर्णधारपदाबाबत चर्चा केली होती. मात्र ही चर्चा त्याने वैयक्तिकरित्या केली होती. त्यानं निवडसमिती सदस्य म्हणून ही चर्चा केली नव्हती. यावेळी आफ्रिदीने उपकर्णधारपद नाकारल्याचं सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.