पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCBच्या एका निर्णयामुळे बाबर, रिझवान अन् शाहीनचे लाखोंचे नुकसान

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे.
Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi
Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridiेोकोत
Updated on

Global T20 Canada 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता पीसीबीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीविरोधात मोठा निर्णय दिला आहे. या तिन्ही खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi
पाकिस्तानी खेळाडूंनी कार्टून'गिरी बंद करावी! Mohammed Shami फुल्ल मूडमध्ये, माजी कर्णधारचा घेतला समाचार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमध्ये सहभागी होण्यासाठी एनओसी दिलेली नाही. ग्लोबल टी-20 कॅनडा लीग 25 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे व्यस्त क्रिकेट वेळापत्रक लक्षात घेऊन, या तीन खेळाडूंचा सल्ला घेतल्यानंतर आणि राष्ट्रीय निवड समितीशी बोलल्यानंतर, आम्ही ही विनंती स्वीकारत नाही.

हे तिन्ही खेळाडू आमचे सर्व फॉरमॅटचे खेळाडू आहेत आणि पुढील 8 महिन्यांत राष्ट्रीय संघाला त्यांची गरज आहे. त्यामुळे या तिन्हींवरील कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi
Mohammed Shami : 'हिंम्मत असेल तर...' सानिया मिर्झाशी लग्नाच्या अफवांवर संतापला शमी; म्हणाला की...

प्रेस रिलीझ जारी करून PCB ने सांगितले की, कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त, इतर खेळाडूंनी ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी मागितली होती, परंतु पाकिस्तानी संघाचे आगामी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेऊन त्यांना एनओसी देण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाला पुढील 8 महिन्यांत 9 कसोटी सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये 3 सामने इंग्लंड विरुद्ध आणि 2-2 सामन्यांची मालिका बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान 15 एकदिवसीय सामने आणि 9 टी-20 सामनेही खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.