Babar Azam ला संघातून वगळण्याच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे PBC ची फखर झमानला नोटीस

PAK vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाहला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
Fakhar zaman
Fakhar zamanesakal
Updated on

PCB issues notice to Fakhar Zaman: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात हार पत्करल्यानंतर पाकिस्तानने संघात बदल केला. दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहिर केलेल्या संघातून माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व नसीम शाहला वगळण्यात आले आहे. बाबरसारख्या मुख्या फलंदाजाला संघातून वगळण्याच्या निर्णयावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर झमानने पीबीसीसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे पीबीसी फखर झमान नोटीस जाहीर केली आहे.

फखर झमान सोशल मीडियीवर पोस्ट करत म्हणाला,"भारताने विराट कोहलीला त्याच्या २०२० आणि २०२३ मधील खडतर धावपळीत संघातून काढले नाही. जेव्हा त्याची सरासरी अनुक्रमे १९.३३, २८.२१ आणि २६.५० होती. एका प्रमुख फलंदाजाला संघातून बाजूला केल्यामुळे संपूर्ण संघामध्ये नकारात्मक संदेश जाऊ शकतो. आपण आपल्या प्रमुख खेळाडूंना कमी करण्याऐवजी सुरक्षित ठेवण्यावर भर दिला पाहिजे."

पाकिस्तानने मागील आठवड्यात निवड समितीच्या पॅनलमध्ये बदल केले. ज्यामध्ये आयसीसी पंच अलीम दार यांच्यासह माजी कसोटीपटू आकिब जावेद,अझहर अली, हसन चीमा, यांची निवड समितीमध्ये नवनियुक्ती करण्यात आली. पीबीसीच्या सुधारीतने इंग्लंडविरूद्धचा पहिला सामना हारल्यानंतर संघात बदल करण्याचा निर्णय घेतला.

"आम्हाला सध्याचा खेळाडूंचा फॉर्म, पाकिस्तानचे २०२४-२५ चे आंतरराष्ट्री वेळापत्रक व मालिकेत पुनरागमन या गोष्टींचा सखोल विचार करावा लागला. या बाबी लक्षात घेऊन आणि पाकिस्तान क्रिकेट तसेच खेळाडूंच्या हितासाठी, आम्ही बाबर आझम, नसीम शाह, सरफराज अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे." असे निवड समितीचे सदस्य आकिब जावेद यांनीसांगितले.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.