Pakistan vs Bangladesh Tickets Price : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमान म्हणून जोरदार तयारीला लागले आहे. भारतीय संघाने लाहोरमध्ये यावं आणि खेळावं यासाठी ते ICC ला गळ घालत आहेत. पण, BCCI पाकिस्तानात संघ न पाठवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ही सर्व चर्चा सुरू असताना पाकिस्तानात क्रिकेटची काय अवस्था झाली आहे, याची वस्तुस्थिती सांगणारी बातमी समोर आली आहे. या महिन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तेथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Pakistan vs Bangladesh कसोटी सामने पाहण्यासाठी किती प्रेक्षक स्टेडियमवर येतील याची PCB लाच खात्री नाही. १६ महिन्यानंतर पाकिस्तानत होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये खेचून आणण्याचे आव्हान PCB समोर आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक येतील की नाही, हाही प्रश्न PCB ला सतावतोय.
या मालिकेत स्टेडियम रिकामी दिसण्याची भीती PCB ला आहे आणि त्यामुळेच त्यांनी कराची येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यांची तिकीटं हे १५ रुपयांत विकायला ठेवली आहेत. पाकिस्तान सुपर लीग ( PSL) २०२४ मध्येही कराची स्टेडियमकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. चाहत्यांनी एलिमिनेटर किंवा फायनल लढतीला येणं पसंत केलं नव्हतं. त्यामुळे कसोटी सामना पाहायला कोण येईल, असा प्रश्न PCB ला सतावतोय.
स्टेडियम रिकामं दिसू नये यासाठी कराची स्टेडियममधील वसीम बारी पॅव्हेलियनचे तिकीट १५ रुपयांना विकण्याचा निर्णय PCB ने घेतला आहे. प्रेक्षकांचा पाच दिवसांचा पास हवा असेल तर त्यांना ७२ रुपये ( PKR 215) मोजावे लागणारर आहेत. दरम्यान, या स्टेडियममध्ये तुम्हाला फुल हॉस्पिटॅलिटी हवी असेल तर ८३,३३३ रुपयांचं तिकीटही उपलब्ध आहे.
बांगलादेशचा कसोटी संघ - नजमुल होसैन शांतो ( कर्णधार), महमुदूल हसन जॉय, जाकीर हसन, शादमन इस्लाम, मोमिनूल हक, मुश्फीकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराज, तैजूल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शोरिफूल इस्लाम, हसन महमुद, तस्किन अहमद, खालेद अहमद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.