Denmark Open 2024 स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात; PV Sindhu चा पराभव

PV Sindhu: डेन्मार्क ओपन २०२४ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभव पत्कारावा लागला आहे.
P. V. sindhu
P. V. sindhuesakal
Updated on

Denmark Open 2024: डेन्मार्क ओपन २०२४ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पॅरिस ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेत्या ग्रेगोरिया तुन्जुंगकडून पराभव झाला आणि त्याचबरोबर डेन्मार्क ओपन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

एक तास चाललेल्या लढतीत सिंधूचा १३-२१, २१-१६, ९-२१ असा पराभव झाला. सिंधू आणि ग्रेगोरिया यांच्यात या लढतीअगोदर १२ सामने झालेले आहेत. यातील केवळ दोनच सामने ग्रेगोरियाला जिंकता आलेले आहेत. इतके वर्चस्व असूनही सिंधूला विजय मिळवता आला नाही. दुसरा गेम २१-१६ अशा फरकाने जिंकल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये ती ९-२१ अशी निष्प्रभ ठरली.

P. V. sindhu
Senior Women T-20 Cricket : वरिष्ठ महिला क्रिकेट संघात ईश्वरी, तेजस्विनी! टी-ट्वेंटी स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

या डेन्मार्क ओपन स्पर्धेत सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि सातव्या स्थानावर असलेल्या खेळाडूंना पराभूत करून वाटचाल कायम ठेवली होती. आजच्या सामन्यात तिने दुसरा गेम जिंकला असला तरी त्यासाठी शर्थ करावी लागली होती. या गेमध्ये ६-१ अशी आघाडी घेतल्यानंतर ग्रेगोरियाने ६-६ अशी बरोबरीही साधली होती. हा गेम ११-१० अशा रंगतदार स्थितीत होता. त्यानंतर सिंधूने २१-१६ अशी बाजी मारली, मात्र हाच खेळ तिला अंतिम गेमध्ये कायम ठेवता आला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.