'RCB गॉड गिफ्टेड फ्रँचायझी'; अश्विनने केले आरसीबी चाहत्यांचे कौतुक, पाहा काय म्हणाला..

IPL 2025 Retention : आयपीएल २०२५ रिटेंशनसाठी विराट कोहली आरसीबीची पाहिली पसंत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे विराटच्या मानधनात वाढ होणार आहे.
Virat kohli
Virat kohliEsakal
Updated on

RCB Fans Loyalty For Virat and Team: आरसीबीने गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात एकदाही विजेतेद न पटकवल्यामुळे इतर संघांच्या चाहत्यांकडून आरसीबी संघाला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. असे असले तरी आरसीबी चाहते नेहमीच आरसीबी संघाला सपोर्ट् करताना पाहायला मिळतात त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे विराट कोहली.

विराट कोहलीचे जगभरात करोडो चाहते आहेत. विराट कोहलीवरील प्रेमापोटी अनेक चाहते आरसीबी संघाकडे आकर्षिक झाले आहेत. आरसीबी संघ आत्तापर्यंत ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी त्यांच्याकडे प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. जो कठीण काळात संघाचे समर्थन करत असतो. आरसीबी चाहत्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्यांचे कौतुक केले आहे.

Virat kohli
Gautam Gambhir: 'पदार्पणावेळी होती तशीच भूक अजूनही...', विराटच्या टीकाकारांना गंभीरचं सडेतोड उत्तर

रवी अश्विन म्हणाला, " आरसीबी चाहते विराट कोहलीवर निःस्वार्थ प्रेम करतात. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे थोडे निराश होतात. पण ते नेहमीच संघाच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आरसीबी एक गॉड गिफ्टेड फ्रँचायाझी आहे. आरसीबी संघ मागील १० वर्षात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. "

"विराटची खेळण्याची शैली काही औरच आहे. संघ दाबावाच्या परिस्थितीमध्ये असताना त्याने ज्याप्रकारे खेळी करून संघाला विजयी केले आहे. त्याप्रकारची खेळी संपूर्ण क्रिकेट जगतात कोणीही केलेली नाही. " अश्विन पुढे म्हणाला

Virat kohli
Jasprit Bumrah ला का केलं कसोटी संघाचा उपकर्णधार? रोहित शर्मानं सांगितली मन की बात

आयपीएल २०२५ साठी संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी फ्रँचायजींना ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करायची आहे. आरसीबी संघ रिटेंशनसाठी पहिली पसंती विराटला देईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या रिटेंशन नियमानुसार (१८ कोटी) आता विराट कोहलीच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.