शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

R Ashwin 5 Wickets Haul: भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
R Ashwin and Ravindra Jadeja
R Ashwin and Ravindra JadejaX/BCCI
Updated on

R Ashwin Records: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेला पहिला कसोटी सामना आर अश्विनसाठी विक्रमी ठरला आहे. अश्विनने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने दुसऱ्या डावात ६ विकेट्स पूर्ण करण्याबरोबरच मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

अश्विनने कसोटीमध्ये एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही ३७ वी वेळ आहे. त्यामुळे त्याने आता कसोटीत सर्वाधिकवेळा एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर रिचर्ड हॅडली यांना मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावरील शेन वॉर्न याची बरोबरी केली आहे.

वॉर्न यानेही ३७ वेळा कसोटीत डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन अव्वल क्रमांकावर आहे. मुरलीधरनने तब्बल ६७ वेळा डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

R Ashwin and Ravindra Jadeja
IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

याबरोबरच अश्विननने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही आठवे स्थान मिळवले आहे. त्याने कर्टनी वॉल्श यांच्या ५१९ विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अश्विनच्या आता कसोटीत १०१ सामन्यांमध्ये ५२२ विकेट्स झाल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • ८०० विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (१३३ सामने)

  • ७०८ विकेट्स - शेन वॉर्न (१४५ सामने)

  • ७०४ विकेट्स - जेम्स अँडरसन (१८८ सामने)

  • ६१९ विकेट्स - अनिल कुंबळे (१३२ सामने)

  • ६०४ विकेट्स - स्टूअर्ट ब्रॉड (१६७ सामने)

  • ५६३ विकेट्स - ग्लेन मॅकग्रा (१२४ सामने)

  • ५३० विकेट्स - नॅथन लायन (१२९ सामने)

  • ५२२ विकेट्स - आर अश्विन (१०१ सामने)

  • ५१९ विकेट्स - कर्टनी वॉल्श (१३२ सामने)

R Ashwin and Ravindra Jadeja
IND vs BAN: लोकल बॉय R Ashwin चेपॉकवर चमकला! थेट MS Dhoni शी बरोबरी अन् मोडले अनेक विक्रम

भारताचा विजय

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध २८० धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात अश्विनचे तर मोठे योगदान राहिलेच, त्याचबरोबर रविंद्र जडेजाही या सामन्यात चमकला. त्याने पहिल्या डावात ११३ धावांची खेळी करणाऱ्या अश्विनबरोबर १९९ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात जडेजाने ८६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या.

बांगलादेशला पहिल्या डावात १४९ धावाच करता आल्या, त्यामुळे भारताने २२७ धावांची आघाडी घेतली. भारताकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारताने दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. भारताकडून शुभमन गिलने ११९ धावांची नाबाद खेळी केली, तर ऋषभ पंतने १०९ धावांची खेळी केली. त्यानंतर भारताने दिलेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद २३४ धावाच करता आल्या.

बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने ८२ धावांची खेळी केली. त्याला कोणाची फारशी साथ मिळाली नाही. भारताकडून अश्विनने ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने ३ विकेट्स घेतल्या आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.