R Ashwin Video: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशला रविवारी (२२ सप्टेंबर) पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी पराभूत केले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयात अनुभवी अष्टपैलू आर अश्विनचा मोठा वाटा राहिला.
त्याने या सामन्यात पहिल्या डावात ११३ धावांची शतकी खेळी केली, तसेच त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६ विकेट्सही घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
दरम्यान, चेपॉक स्टेडियम हे अश्विनचे घरचे मैदान आहे. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर आणि मैदानात त्याने मोठा पराक्रम करून दाखवला. या सामन्यासाठी अश्विनचे आई-वडील, पत्नी प्रीती आणि मुली अखिरा व आध्या या देखील स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.
सामना संपल्यानंतर तो कुटुंबाला मैदानात भेटलाही. यादरम्यानचा एक व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अश्विन त्याची पत्नी आणि मुलीशी बोलताना दिसत आहे.
रविवारी जागतिक कन्या दिनही साजरा करण्यात आला. त्यामुळे या व्हिडिओमध्ये प्रीती अश्विनला मुलींना काय भेट देणार असं म्हणाली. त्यावर अश्विन म्हणाला मी ज्या चेंडूने ५ विकेट्स घेतल्यात. तो चेंडू त्यांना देतो. पण त्याच्या मुली नको असं म्हणाल्या, त्यावर त्याने मग काय हवे असं विचारलं. त्यावर त्यांनी माहित नाही, असंही म्हटल्या.
दरम्यान, प्रीतीने त्याला घरच्या मैदानावर खेळताना कसं वाटलं असं विचारलं. त्यावर अश्विन म्हणाला, ''मला माहित नाही की कसं रिऍक्ट करू. पहिल्या दिवशी गोष्टी खूप अचानक झाल्या. मी विचारही नव्हता केला की शतक होईल. मी जेव्हाही इथे येतो, तेव्हा खूप स्पेशल वाटतं. या मैदानात कोणती तरी ऊर्जा आहे, जी मला येथे खेचते.'
याशिवाय प्रीतीने नंतर अश्विनकडे तो स्टेडियममध्ये तिच्याकडे लक्ष देत नसल्याची गोड तक्रारही करते. पण तो तिला ती दिसली नसल्याचे मान्य करतो. अश्विनचा हा कुटुंबाबरोबरचा गोड व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सामन्यात अश्विनने रविंद्र जडेजाबरोबर पहिल्या डावात १९९ धावांची विक्रमी भागीदारीही केली. जडेजानेही पहिल्या डावातल ८६ धावांची खेळी केली होती. तसेच त्याने दोन्ही डावात ५ विकेट्सही घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.