R Ashwin: आर अश्विनच्या IPL प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबई इंडियन्सचे ४ खेळाडू, तर CSK च्या दोघांना संधी; पण चहल, गेल अन् ब्रावोला जागा नाही

Captain MS Dhoni: रविचंद्रन अश्विनने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड केली आहे.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwinesakal
Updated on

Ravichandran Ashwin’s All-Time IPL XI : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याचा सर्वकालीन आयपीएल इलेव्हन संघ निवडला आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधार रोहित शर्मासह आणखी ३ खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. याबरोबरच चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व आणखी एका खेळाडूची संघात निवड केली आहे. परंतु २०५ विकेट्स म्हणजेच आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलसह ड्वेन ब्रावोला देखील संघात स्थान दिलेले नाही.

२००९ साली अश्विनने चेन्नई सुपर किंग्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. अश्विनने वेवेगळ्या फ्रँचायझींसाठी आत्तापर्यंत एकूण २१२ सामने खेळेल आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ८०० धावांसह १८० विकेट्स घेतले आहेत. अश्विन सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.

Ravichandran Ashwin
Rahul Dravid Son: समित द्रविड U19 टीम इंडियातील निवडीनंतर झाला व्यक्त; म्हणाला, 'मी या क्षणासाठी...'

अश्विनने आपल्या संघात सलामीवर फलंदाज म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे. ज्याने आयपीएलच्या २५७ सामन्यांमध्ये ६६२८ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये एकूण ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर रोहितने डेक्कन चार्जेस संघाचे प्रतिनिधित्व करताना एक आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

अश्विनने फलंदाजीमध्ये आरसीबी (RCB)संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचीही सलामीसाठी निवड केली आहे. विराटने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २५२ सामने खेळून १३१.९७ च्या स्ट्राइक रेटने ८००४ धावा केल्या आहेत. विराट आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर 'मिस्टर आयपीलएल' सुरेश रैनाचा समावेश केला आहे. रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २०५ सामने खेळून ५५२८ धावा बनवल्या आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या यशामध्ये रैनाचे महत्वपूर्ण योगदान आहे. अश्विनने फलंदाजीमध्ये धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स यांचादेखील मधल्या फळीत समावेश केला आहे.

Ravichandran Ashwin
Ayush Shukla: ४ ओव्हर, शून्य धावा अन् १ विकेट! मुंबईत जन्मलेल्या खेळाडूची हाँग काँगसाठी कमाल, 'हा' ऐतिहासिक विक्रमही नावावर

त्याचबरोबर संघाचा कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून अश्विनने धोनीची निवड केली आहे. विशेष म्हणजे २००९ साली अश्विनने धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि २०१० साली या दोघांनीही सीएसके संघाला ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

दोन अष्टपैलू खेळाडू राशिद खान व सुनील नरिनला अश्विनने आपल्या संघात स्थान दिले आहे. आयपीएलमध्ये राशिदने २१२ सामन्यांत १४९ विकेट्स घेतल्या आहेत, तर सुनील नरिनच्या नावावर ३ आयपीएल ट्रॉफींसह १०८ विकेट्स आहेत. अश्विनने वेगवान फलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि लसिथ मलिंगा या अनुभवी व कुशल गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे.

रविचंद्रन अश्विनचा सर्वकालीन आयपीएल इलेव्हन संघ :

रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स , एमएस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), सुनील नरिन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()