IND vs BAN: 'जडेजाचे आभार मानेल, कारण त्याने...', R Ashwin चेन्नई कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर काय म्हणाला?

R Ashwin Hails Ravindra Jadeja's Support: भारतीय संघाला चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून देण्यात आर अश्विनने मोलाचा वाटा उचलला. त्याला रविंद्र जडेजाचीही चांगली साथ मिळाली होती.
R Ashwin and Ravindra Jadeja
R Ashwin and Ravindra JadejaSakal
Updated on

R Ashwin Man of The Match: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत २८० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचे मोलाचे योगदान राहिले.

अश्विनने पहिल्या डावात ११३ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच त्याला साथ देताना रविंद्र जडेजाने १९९ धावांची भागीदारी त्याच्याबरोबर केली. जडेजाने ८६ धावांची खेळी केली. तसेच जडेजाने दोन्ही डावात मिळून गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. अश्विनने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, अश्विनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामन्यानंतर अश्विनने त्याच्या खेळाबरोबर जडेजाचेही कौतुक केले.

R Ashwin and Ravindra Jadeja
IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

अश्विन म्हणाला, 'जेव्हाही मी चेन्नईमध्ये प्रेक्षकांसमोर खेळतो, तेव्हा मला मस्तच वाटते. मी या स्टेडियमच्या स्टँड्समध्ये बसून खूप कसोटी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिले आहे. मी या स्टँट्ससमोर मैदानात क्रिकेट खेळलोय.'

'स्टेडियमचे चांगले नुतनीकरणही करण्यात आलंय. मला यातून काय हवं आहे यापेक्षा मी जे करत आहे, त्यामुळे कदाचीत मी माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. माझ्याकडे लढण्याची संघी होती, हे एक कारण आहे आम्हाला का सामना खेळायचा आहे.'

'मी जडेजाचेही त्याने जे केले त्यासाठी आभार मानेल. त्याने कठीण परिस्थितीत मला खूप पाठिंबा दिला. पहिल्या दिवशी झालेली खेळी खास होती. आज मला विकेट्सही मिळाल्या, त्याचा आनंद आहे. माझ्यासाठी गोलंदाजीला प्रथम प्राधान्य आहे. गेल्या काही वर्षात मी फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये चांगली विभागणी करू शकलो आहे, अजूनही माझ्या खेळावर माझे काम सुरू आहे.'

R Ashwin and Ravindra Jadeja
शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

अश्विन सामन्यानंतर अभिनव मुकुंद, पार्थिव पटेल आणि तमिम इक्बाल यांच्याशी बोलताना म्हणाला की जेव्हा तो संघात आला होता, तेव्हा हरभजन सिंगची जागा भरून काढण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर होती. हरभजन त्याच्यासाठी आदर्श राहिला होता.

तसेच त्याने सांगितले की आयपीएलचा प्रवासही चेन्नईतून सुरू झाला. त्याचबरोबर त्याने सांगितले की फलंदाजीला गेल्यानंतर तो गोलंदाजासारखा विचार करतो, तर गोलंदाजी करताना फलंदाजासारखा विचार करतो. तसेच जडेजा हा विश्वासू फलंदाज असल्याचेही त्याने म्हटले.

अश्विनने आता कसोटीत ५२२ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा आठव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने कर्टनी वॉल्श यांच्या ५१९ विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

तसेच त्याने ३७ व्यांदा डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे कसोटीत सर्वाधिकवेळा डावात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही त्याने शेन वॉर्नची बरोबरी केली आहे. वॉर्ननेही ३७ वेळा कसोटीमध्ये डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने ६७ वेळा असा कारनामा केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.