'टीम इंडियात आलो तेव्हा हरभजनची जागा भरण्याची जबाबदारी...', R Ashwin मोकळेपणाने झाला व्यक्त

Most wickets in test cricket: ५२२ विकेट्ससह आर आश्विन सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या टॉप - ८ गोलंदाजांमध्ये सामील झला आहे. यावेळी त्याने काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत
R ashwin
R ashwinesakal
Updated on

Ravichandran Ashwin: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीर ठरला. भारताने हा सामना २८० धावांनी जिंकला आणि मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. हा सामना चेन्नई येथील एम ए चिंदंबरम मैदानावर झाला. सामनावीर आर अश्विनने या मैदानातील त्याच्या आठवणी व अनुभव शेअर केले आहेत.

अश्विनने या कसोटी सामन्यात ६ विकेट्स घेतले व आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील आपले ५२२ विकेट्स पूर्ण केले. या ५२२ विकेट्ससह आश्विन सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या टॉप-८ गोलंदाजांमध्ये सामील झला आहे. आश्विनने या यशाबद्दल बोलताना आपल्या कारर्किदीच्या सुरूवातीला तो हरभजन सिंगच्या गोलंदाजी शैलीची कॉपी करत असल्याचे सांगितले.

R ashwin
IND vs BAN: 'जडेजाचे आभार मानेल, कारण त्याने...', R Ashwin चेन्नई कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर काय म्हणाला?

अश्विन म्हणाला, " हरभजन सिंगच्या जागी माझी भारतीय संघामध्ये निवड झाली होती. माझ्यावर त्याची जागा भरून काढण्याची मोठी जबाबदारी होती. सुरूवातीला गोलंदाजी करताना मी त्याची कॉपी करत असे. ज्युनियर क्रिकेटमध्ये तो माझ्यासाठी आदर्श होता. मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेन की नाही यावर लोक शंका घेत होते, कारण मी आयपीएलमधून पुढे आलो होतो. परंतु अनेक खेळाडूंनी पुढे मला मदत केली आणि माझा खेळ सुधरला."

चेन्नईतील मैदानाबाबत अश्विन म्हणाला, "एकेकाळी हे मैदान काँक्रीटचे होते. मी या मैदानावर पहिल्यांदा सचिन तेंडुलकरला पाहिले होते. या मैदानावर खेळायचे माझे स्वप्न होते. माझा पहिला आयपीएल सामना देखील इथेच झाला होता. या मैदानावर काहीतरी उर्जा आहे जी मला या मैदानाकडे खेचते."

R ashwin
मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

चेन्नईच्या या खेळपट्टीवरील गोलंदाजीबाबत अश्विन म्हणाला, “या सामन्यात गोलंदाजी करताना वेग महत्त्वाचा होता. मी कमी गतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. ही अशी खेळपट्टी आहे जिथे तुम्ही सावकाश गोलंदाजी केल्यास विकेट्स मिळतात. पण जर तुम्ही खूप कमी गतीने गोलंदाजी केली तर फलंदाजाला बॅकफूटवर खेळायला वेळ मिळतो.'

'मला दडपणाखाली राहायला आवडते. जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा मी गोलंदाजाप्रमाणे विचार करतो, षटक संपताना मी आक्रमण करायला जात नाही. अन्यथा मी आक्रमण करून आणि गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो," असे अश्विन पुढे म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.