Rachin Ravindra: रचिनने जिंकला न्यूझीलंडचा सर्वात मोठा पुरस्कार, 'हा' पराक्रम करणारा सर्वात तरुण क्रिकेटर

New Zealand Cricket Award: रचिन रविंद्रने न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात मोठा पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे.
Rachin Ravindra
Rachin RavindraX/BLACKCAPS
Updated on

Rachin Ravindra News : बुधवारी (13 मार्च) न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा 2024 क्रिकेट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात 2023-24 हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात आला.

24 वर्षीय क्रिकेटपटू रचिन रविंद्रने न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला आहे. त्याला या हंगामातील न्यूझीलंडचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा सर रिचर्ड हॅडली मेडल मिळाले आहे.

त्याने 2023-24 हंगामात तिन्ही क्रिकेट प्रकारात शानदार कामगिरी केली होती. 2023 वनडे वर्ल्डकपमध्येही तो चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 578 धावा या स्पर्धेत केल्या होत्या.

Rachin Ravindra
IPL 2024 : ऋषभ पंत आला मात्र... दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! संघाचा स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेब्रुवारीच्या सुरुवातीला कसोटीत 240 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्याच्या या हंगामातील एकूण कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंडचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकता आला. तो हा पुरस्कार जिंकणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.

एमेलिया केर ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटर

एमेलिया केर न्यूझीलंडची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिला डेबी हॉकली मेडल मिळाले आहे. इतकेच नाही, तर ती न्यूझीलंडची सर्वोत्तम महिला वनडे आणि महिला टी20 क्रिकेटपटूही ठरली आहे.

अष्टपैलू केरने या हंगामात वनडेत 67 च्या सरासरीने 541 धावा केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ती या हंगामात सर्वाधक विकेट्स घेणारी न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. तिने 252 धावाही केल्या आहेत.

Rachin Ravindra
Mohammed Shami Update : 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट

विलियम्सन, मिचेलनेही जिंकले पुरस्कार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने या हंगामात कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वात्तम वनडे पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार डॅरिल मिचेलने जिंकला आहे, तर सर्वोत्तम टी20 पुरुष क्रिकेटपटूचा मिचेल सँटेनरने जिंकला आहे.

न्यूझीलंड वार्षिक क्रिकेट पुरस्कार 2024

  • सर रिचर्ड हॅडली मेडल - रचिन रविंद्र

  • डेबी हॉकली मेडल - एमेलिया केर

  • बर्ट सटक्लिफ मेडल (सर्वोत्तम क्रिकेट सेवा) - ट्रुडी अँडरसन

  • सर्वोत्तम कसोटीपटू - केन विलियम्सन

  • सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटू - डॅरिल मिचेल

  • सर्वोत्तम टी20 पुरुष क्रिकेटपटू - मिचेल सँटेनर

  • सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू - एमेलिया केर

  • सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू - एमेलिया केर

  • सर्वोत्तम देशांतर्गत पुरुष क्रिकेटपटू - नॅथन स्मिथ

  • सर्वोत्तम देशांतर्गत महिला क्रिकेटरटू - इमा ब्लॅक

  • द रेडपाथ कप (सर्वोत्तम प्रथम श्रेणी पुरुष फलंदाज) - केन विलियम्सन

  • द रुथ मार्टिन कप (सर्वोत्तम महिला देशांतर्गत फलंदाज) - सुझी बेट्स

  • द विन्सर कप (सर्वोत्तम प्रथम श्रेणी पुरुष गोलंदाज) - मॅट हेन्री

  • द फिल ब्लॅकलर कप (सर्वोत्तम महिला देशांतर्गत गोलंदाज) - एमा ब्लॅक

  • जीजे गार्डनर होम्स सर्वोत्तम न्यूझीलंडचे पंच - ख्रिस ब्राऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.