Team India Racism : भारताच्या 2007 च्या टी20 वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडू याचबरोबर 2011 च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघात समाविष्ट असलेल्या एस श्रीसंतने धक्कादायक खुलासा केला आहे. केरळच्या श्रीसंतने खुलासा केला की आयुष्यभर मला संघातील खेळाडूंनी मद्रासी म्हणून म्हणत माझी चेष्टा केली.
मद्रासी हे तामिनाडूमध्ये राहणाऱ्या लोकांना बोलवलं जातं. मात्र उत्तर भारतातील काही खेळाडू हे मुंबईच्या खालील सर्व लोकांसाठी मद्रासी शब्दप्रयोग वापरायचे.
एस श्रीसंतने 2005 मध्ये नागपूर येथे खेळवल्या गेलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने द रणवीर शो या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'मी हा शब्द 13 वर्षाखालील संघात असल्यापासून ऐकत आलो आहे. त्यावेळी आमच्याकडे कोची टस्करची टीम होती. त्यावेळी असं वाटायचं की देशाकडून पुन्हा खेळत आहे.'
याच मुलाखतीत श्रीसंतने कोची टस्करने अजून त्याचे पैसे दिले नसल्याचा खुलासा केला. श्रीसंतने आयपीएल 2011 च्या हंगामात कोची टस्करकडून खेळला होता. त्यानंतर हा संघ निलंबित करण्यात आला. श्रीसंतने भारताकडून तीनही फॉरमॅट खेळले आहेत. त्याने एकूण 169 विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीसंत म्हणाला की, 'कोची टस्करला खूप जास्त पैसे द्यायचे आहेत. त्यांनी अजून दिलेले नाहीत. तुम्ही मुरलीधरनला घ्यायला हवं, महेला जयवर्धनेला देखील या शो वर बोलवा ते सांगतील. मॅक्युलम आणि जडेजाला देखील बोलवा.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.