राहुल द्रविड पुन्हा क्रिकेटच्या पिचवर! गोलंदाजीवर आजमावला हात, Video Viral

Rahul Dravid bowling : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या नव्या संधीच्या शोधात आहे. त्याच्याकडे सध्या काही काम नसलं तरी तो क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही.
rahul dravid bowling.
rahul dravid bowling.esakal
Updated on

Rahul Dravid bowling NCA : राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला २०११ मध्ये बाय बाय केले आणि त्यानंतर त्याने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ नंतर राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. पण, तो क्रिकेटपासून दूर गेलेला नाही. राहुल द्रविडचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविड हा १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. त्याआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) प्रमुखपदी होता आणि अनेक युवा खेळाडू घडवण्याचे काम त्याने केले. त्यानंतर सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले. पण, त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकला आणि स्वप्न पूर्ण केले.

rahul dravid bowling.
Jasprit Bumrah: बुमराहची विश्रांती काही संपेना! T20 वर्ल्ड कपनंतर आणखी एका मालिकेला मुकणार, समोर आलं कारण

कर्नाटकचा हा खेळाडू पुन्हा एकदा बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतला आहे आणि त्याने तेथील स्टाफसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सोसल मीडियावर द्रविड गोलंदाजी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर जेव्हा विराट कोहलीने ट्रॉफी हातात दिली, तेव्हा द्रविडचा जल्लोष पाहण्यासारखा होता. त्याच्या भावनांचा बांध फुटला होता. ''या गोष्टी प्लान करून घडत नसतात. मी अनेकदा माझ्या भावनांवर आवर घातला आहे आणि एक मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्हाला ते करावे लागते. पण, त्याक्षणी मी खूप आनंदी झालो होतो आणि लहान मुलगा असल्याचे मला वाटले. माझ्या सपोर्ट स्टाफसाठी मी खूप आनंदी होतो. या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली,'' असे द्रविड म्हणाला होता.

राहुल द्रविडने १६४ कसोटी सामन्यांत ३६ शतकं व ६३ अर्धशतकांसह १३२८८ धावा केल्या आहेत, तर ३४४ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १२ शतकं व ८३ अर्धशतकांसह १०८८९ धावा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.