Rahul Dravid Head Coach IPL 2025 : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पुन्हा मख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दी वॉल द्रविड त्याच्या जुन्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघात परतला आहे आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. द्रविडने आयपीएल लिलावापूर्वी ( mega auction ) कोणत्या खेळाडूंना संघात कायम राखायचे याबाबत फ्रँचायझीसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. राहुलने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासोबत यापूर्वीही काम केलं आहे.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील जे खेळाडू घडले, त्या बॅचमधील संजू आहे. भारताचा वर्ल्ड कप विजेता महान प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. RR त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी करारबद्ध करण्याची शक्यता आहे. रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपचे सीईओ जेक लश मॅक्रम यांनी त्याचे गुलाबी जर्सी देऊन स्वागत केले. "वर्ल्ड कप विजानंतर आणखी एक आव्हान स्वीकारण्याची हिच योग्य वेळ आहे, असे मला वाटले आणि ते करण्यासाठी रॉयल्स ही योग्य जागा आहे", असे यावेळी द्रविड म्हणाला.