Rahul Dravid Son: समित द्रविडची टीम इंडियात निवड वशिलेबाजीने नव्हे, तर कर्तुत्वाच्या जोरावर...; पाहा त्याची खणखणीत आकडेवारी

Samit Dravid Performance: राहुल द्रविडचा मुलगा समित याची आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली आहे. त्याची कामगिरी कशी राहिलीये जाणून घ्या.
Rahul Dravid - Samit Dravid
Rahul Dravid - Samit DravidSakal
Updated on

Rahul Dravid Son Samit Stats: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे क्रिकेटमधील योगदान महत्त्वाचे राहिले आहे. आता त्याच्या मुलाला खेळताना पाहाण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. त्याचा मोठा मुलगा समितची आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९वर्षांखालील मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठीच्या मालिकेसाठी बीसीसीआयने शनिवारी १९ वर्षांखाली भारतीय संघ जाहीर केला. या दोन्ही संघांत समित द्रविडचे नाव आहे.

त्याच्या निवडीमागे अनेकांनी घराणेशाहीचा आणि वशिलेबाजीचाही दावा केलाय. मात्र, समितची आत्तापर्यंतची कामगिरी पाहाता ती चांगली राहिल्याचे दिसून येत आहे. १८ वर्षीय समितने वयोगटातील क्रिकेट गाजवले आहे.

Rahul Dravid - Samit Dravid
Samit Dravid: द्रविडच्या लेकाचा आक्रमक अंदाज! T20 सामन्यात ठोकला जबरदस्त सिक्स, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.