Rahul Dravid Head Coach IPL 2025 : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर नोकरी नसल्याचे म्हटले होते. पण, अखेरीस त्याला नोकरी मिळाली.. आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये राहुल द्रविड पुन्हा मख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दी वॉल द्रविड त्याच्या जुन्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघात परतणार आहे. त्याच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली गेली आहे.
द्रविडने फ्रँचायझीसोबतच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे आणि त्याने आगामी लिलावापूर्वी ( mega auction ) कोणत्या खेळाडूंना संघात कायम राखायचे याबाबत फ्रँचायझीसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. राहुलने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्यासोबत यापूर्वीही काम केलं आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील जे खेळाडू घडले, त्या बॅचमधील संजू आहे.
राहुल द्रविडने २०१२ व २०१३ मध्ये RR संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि २०१४ व २०१५ च्या पर्वात तो या संघाचा संचालक व मेंटॉर होता. २०१६ मध्ये राहुल द्रविड दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडे गेला आणि त्यानंतर २०१९ मध्ये बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. २०२१ मध्ये त्याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवला होता.
RR त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी करारबद्ध करण्याची शक्यता आहे. राठोड हे २०१९ पासून द्रविडच्या NCA स्टाफमध्ये आहेत. कुमार संगकारा हा RR चा संचालक असणार आहे.
२००८ नंतर RR ला आयपीएल जेतेपद जिंकता आलेले नाही. ते २०२२ मध्ये फायनलपर्यंत पोहोचले होते आणि गुजरात टायटन्सकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. आयपीएल २०२३ मध्ये त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते, तर २०२४ मध्ये ते क्वालिफायर २ पर्यंत पोहोचले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.