तुझी कामगिरीच बोलकी असायला हवी! Samit Dravid ला राहुलने दिला होता सल्ला

Samit Dravid in India's U19 squad: भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा समित सध्या चर्चेत आहे, कारण त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
Samit Dravid
Samit Dravidesakal
Updated on

Rahul Dravid advice to Samit Dravid : महाराजा ट्वेंटी-२० लीगमध्ये काही उल्लेखनीय कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या समित द्रविडची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे व दोन चार दिवसीय सामन्यांसाठी राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय संघात निवड झाली.

समितची कामगिरी...

  • अष्टपैलू समितीने १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत २०१६ मध्ये १२५ धावांची खेळी केली होती.

  • त्याने २०१८ मध्ये कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेत १५० धावा चोपल्या होत्या.

  • २०१९ मध्येही १४ वर्षांखालील सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. कुच बिहार ट्रॉफी २०२४ स्पर्धेतही कर्नाटकला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

  • त्याने या स्पर्धेत ८ सामन्यांमध्ये ३६२ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या होत्या.

  • आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेतही ४ सामन्यांत जवळपास १३० धावा ठोकल्या होत्या.

  • कर्नाटन संघाकडून केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर द्रविडची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.

Rahul Dravid Son Samit play in T20 League
Rahul Dravid Son Samit play in T20 League sakal

राहुल द्रविडचा सल्ला...

समितच्या १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याचे कोच कार्तिक जेस्वनाथ यांनी राहुलने मुलाला दिलेल्या सल्ल्याबाबत सांगितले. राहुल द्रविडने मिळवलेल्या प्रसिद्धीत हरवून न जाता स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा त्याला सल्ला मिळाला होता.

''आपल्या वडिलांची प्रसिद्धी पाहत समित मोठा झाला आणि त्याला हे माहीत होतं की त्याचं प्रचंड दडपण त्याच्यावर पुढे जाऊन असेल. त्यामुळेच राहुल आणि मी त्याला एक सल्ला दिला, बाहेर काय चर्चा सुरू आहे किंवा काय घडतंय, याची पर्वा करू नकोस. मैदानावर तू जी कामगिरी करशील त्यावरूनच तुझी निवड केली जाईल. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रीत करण्यास आम्ही त्याला सांगितले,''असे कार्तिक यांनी सांगितले.

Samit Dravid
IPL 2025 Auction: राहुलचा लेक, Samit Dravid आयपीएल २०२५ खेळणार? पात्रता निकष काय आहेत ते घ्या जाणून

Squad for series:

वन डे मालिकेसाठी संघ: रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमान ( कर्णधार ), किरण चोरमाले, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया, समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद इनान

चार दिवसीय मालिकेसाठी संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन ( कर्णधार ), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया, चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद इनान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.