Samit Dravid: द्रविडच्या लेकाचा आक्रमक अंदाज! T20 सामन्यात ठोकला जबरदस्त सिक्स, पाहा Video

Rahul Dravid Son Samit Six: राहुल द्रविडचा मुलगा समित आता वरिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळताना दिसत आहे.
Rahul Dravid Son Samit Big Six
Rahul Dravid Son Samit Big SixSakal
Updated on

Samit Dravid's big six Video: भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचं नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं गेलं आहे. त्याने खेळाडू म्हणून कारकि‍र्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. आता ज्युनियर द्रविडला क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. सध्या त्याच्या एका षटकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

द्रविडचा मुलगा समित हा देखील क्रिकेटपटू असून आता तो वरिष्ठ स्तरावरही खेळताना दिसत आहे. यापूर्वी समित वयोगटातील क्रिकेट खेळला आहे. वयोगटातील क्रिकेट खेळताना अनेकदा त्याने त्याची प्रतिभा दाखवली आहे.

आता कर्नाटक प्रीमियर लीगऐवजी सुरू झालेल्या महाराजा ट्रॉफी स्पर्धेत तो खेळताना दिसत आहे. त्याने नुकतेच महाराजा ट्रॉफी या स्पर्धेत पदार्पण केले आहे.

Rahul Dravid Son Samit Big Six
Rahul Dravid return in IPL : राहुल द्रविड आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार; KKR नव्हे 'ही' फ्रँचायझी लवकरच घोषणा करणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.