टीम इंडियाचे 'शिल्पकार' IPL 2025 मध्ये RR ला चॅम्पियन बनवणार; जोडीला आला राहुल द्रविडचा साथीदार

Rajasthan Royals Coaching Staff: राजस्थान रॉयल्सने काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली होती. आता त्याच्या जोडीला त्याच्याच जुना सहकाऱ्याचीही महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Rahul Dravid, T Dilip and Vikram Rathour
Rahul Dravid, T Dilip and Vikram RathourSakal
Updated on

Rajasthan Royals Batting Coach: इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम सुरू होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. परंतु, त्यापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळेच जवळपास प्रत्येक संघ त्यादृष्टीने तयारी करत आहे. परिणामी अनेक संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झाल्याचे दिसून आले होते.

काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाने भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. आता त्यांनी नव्या फलंदाजी प्रशिक्षकाचीही नियुक्ती केली आहे. त्यांनी विक्रम राठोड यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

विशेष म्हणजे द्रविड आणि राठोड यांनी भारतीय संघाबरोबर एकत्र कोचिंग टीममध्ये काम केले आहे. टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात द्रविडबरोबरच विक्रम राठोड यांचेही योगदान होते.

द्रविडसह त्यांचाही भारतीय संघाबरोबरचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ या टी२० वर्ल्ड कपनंतर संपला. त्यांनी भारतीय संघाबरोबर २०१९ ते २०२४ दरम्यान फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

Rahul Dravid, T Dilip and Vikram Rathour
Rahul Dravid: कोच द्रविडला IPL फ्रँचायझींकडून मिळालेली ब्लँक चेकची ऑफर? पण राजस्थान रॉयल्स...

आता पुन्हा एकदा द्रविड आणि राठोड राजस्थान रॉयल्ससाठी एकत्र काम करताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा आहे. त्यामुळे तो देखील द्रविड आणि राठोड यांच्यासह असेल.

या जबाबदारीबद्दल राठोड म्हणाले, 'रॉयल्स कुटुंबाचा भाग बनणे सन्मानाचे आहे. राहुल द्रविडबरोबर आणि युवा खेळाडूंच्या ग्रुपबरोबर काम करण्याची पुन्हा संधी मिळत आहे. मी संघासाठी योगदान देण्यास आणि उच्च दर्जाचे खेळाडू बनवण्याच्या ध्येयासाठी काम करण्यास उत्सुक आहे, जे रॉयल्सला आणि भारताला विजेतेपद मिळवून देऊ शकतात.'

राजस्थान रॉयल्सने २००८ ला झालेल्या पहिल्या आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर त्यांना २०२२ मध्ये अंतिम सामना गाठता आला होता. परंतु त्यांना २००८ नंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

त्यामुळे आता द्रविड आणि राठोड यांच्यासह कोचिंग स्टाफसमोर पुन्हा राजस्थानला विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान असणार आहे. द्रविड यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळलाही आहे.

Rahul Dravid, T Dilip and Vikram Rathour
On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

द्रविड राठोडबद्दल म्हणाला, 'विक्रमबरोबर मी खूप वर्षे काम केले आहे, त्यामुळे त्याच्या तांत्रिक कौशल्याबद्दल, शांत स्वभावाबद्दल आणि भारतीय परिस्थितीची चांगली समज यामुळे तो या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मी खात्रीने सांगू शकतो.'

'आमचा चांगला ताळमेळ असल्याने भारताला आम्ही काही मोठे यश मिळवून देऊ शकलो. त्याच्याबरोबर पुन्हा काम करता येणार असल्याने मी उत्साही आहे. त्याच्याकडे युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे आणि तो राजस्थान रॉयल्ससाठीही हे करेल.'

विक्रम राठोड यांनी २०१९ मध्ये भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारण्यापूर्वी ते चारवर्षे निवड समितीचे सदस्य होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच त्यांनी पंजाब किंग्स संघासाठीही आयपीएलमध्ये काम पाहिले आहे. त्यांनी भारतासाठी ६ कसोटी आणि ७ वनडे सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.