IND vs ENG 5th Test : सरासरी 10.50 तरी रजत पाटीदार पाचव्या कसोटीत खेळणार; कशी असणार टीम इंडियाची Playing 11?

IND vs ENG 5th Test Playing 11 Rajat Patidar : रजत पाटीदारने तीन कसोटीत फक्त 63 धावा केल्या आहेत तरी टीम इंडिया 'या' कारणांमुळे पाचव्या कसोटीत देखील त्याला संधी देईल.
Rajat Patidar
Rajat Patidar esakal
Updated on

IND vs ENG 5th Test Team India Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धमरशमाला येथे 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर दोन्ही संघांनी आज आपले सराव सत्र सुरू केलं.

भारताचा युवा फलंदाज रजत पाटीदारला या मालिकेत संधी देण्यात आली. मात्र त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. मालिकेत च्याची 32 धावांची सर्वोच्च खेळी आहे. मात्र असं असलं तरी तो पाचव्या कसोटीत प्लेईंग 11 मध्ये असण्याची शक्यता आहे. (Latest Cricket Marathi News)

Rajat Patidar
Ranji Trophy 2024 Final : तो निर्णय कर्णधाराचा! मोठ्या पराभवानंतर तमिळनाडू ब्लेम गेम सुरू

रजत पाटीदारने आतापर्यंत फक्त 10.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याला फारसी छाप पाडता आलेली नाही. अशा स्थितीत तो प्लेईंग 11 मधून बाहेर फेकला जाऊ शकतो. मात्र भारतीय संघ व्यवस्थापन असं करण्याची शक्यता नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलयर्सचं देखील मत तसंच आहे.

राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एक पद्धत अवलंबली आहे. ते नव्या खेळाडूंना त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ आणि स्पेस देतात. पाटीदारने तीन कसोटीत फक्त 63 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 10.50 इतकीच आहे.

डिव्हिलियर्स याबाबत आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणला की, 'रजत पाटीदारसाठी ही मालिका काही स्वप्नवत गेलेली नाही. ही मालिका लक्षात ठेवावी अशी देखील कामगिरी तो करू शकलेला नाही. मात्र या भारतीय संघाबाबत एक चांगली गोष्ट ही आहे की ते सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहेत. निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे तुम्ही संघातील स्थान काही काळ का असेना टिकवू शकता.'

Rajat Patidar
Indian Wrestlers Protest : भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक बेकायदा ; खेळाडूंचा आरोप

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला की, 'जर पाटीदारची वृत्ती जर चांगली असेल त्याचे व्यक्तीमत्व जर आवडण्यासारखं असेल तर रोहित आणि निवडसमिती त्याच्यावर विश्वास ठेवून या खेळाडूमध्ये भविष्य आहे असं सांगू शकतात. जरी तो सध्या धावा करत नसला तरी ते त्याला मोठी संधी देऊ शकतात.'

पाचव्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह

(Latest Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.