Ranji Trophy Final: चौथ्या दिवशी करुण नायर मुंबईला नडला, विदर्भाच्या कर्णधाराचेही नाबाद अर्धशतक; फायनल रोमांचक वळणावर

Ranji Trophy Final, Mumbai vs Vidarbha: वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ संघात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना सुरू असून आता शेवटचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
Mumbai vs Vidarbha | Ranji Trophy 2023-24 Final
Mumbai vs Vidarbha | Ranji Trophy 2023-24 FinalSakal
Updated on

Ranji Trophy 2023-24 Final, Mumbai vs Vidarbha : रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध विदर्भ संघात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रविवारपासून (10 मार्च) हा सामना सुरू झाला आहे.

या अंतिम सामन्यात चौथ्या दिवस अखेर विदर्भाने दुसऱ्या डावात 92 षटकात 5 बाद 248 धावा केल्या आहेत. अद्याप विदर्भाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 290 धावांची गरज आहे. तसेच मुंबईला विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे.

Mumbai vs Vidarbha | Ranji Trophy 2023-24 Final
Rachin Ravindra: रचिनने जिंकला न्यूझीलंडचा सर्वात मोठा पुरस्कार, 'हा' पराक्रम करणारा सर्वात तरुण क्रिकेटर

या सामन्यात विदर्भाने मुंबईसमोर 538 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाने चौथ्या दिवशी 2 षटके आणि बिनबाद 10 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. विदर्भाचे सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरे यांनी सयंमी खेळ करत सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. पण चांगल्या सुरुवातीनंतर त्यांना खेळपट्टीवर टिकता आले नाही.

19 व्या षटकात अथर्व तायडेला 32 धावांवर शम्स मुलानी आणि 20 व्या षटकात तनुष कोटीयनने ध्रुव शोरेला 28 धावांवर त्रिफळाचीत केले. पण नंतर अमन मोखडे आणि करुण नायर यांनी डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. पण मोखडेला मुशीर खानने पायचीत केले, तर यश राठोडही 7 धावांवर माघारी परतला.

Mumbai vs Vidarbha | Ranji Trophy 2023-24 Final
IPL 2024 दरम्यानच 'हा' संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, असे आहे T20I मालिकेचे संपूर्ण शेड्युल

यावेळी एक बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या करुणला विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने साथ दिली. त्यांनी 90 धावांची भागीदारी केली. त्यामुळे विदर्भाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. दरम्यान करुणने अर्धशतकही झळकावले.

अखेर दिवसभर एक बाजू सांभाळणाऱ्या करुणचा मोठा अडथळा मुशीर खानने दूर केला. करुण नायरने 220 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने अवघे 3 चौकार मारले.

तो बाद झाल्यानंतर दिवस संपेपर्यंत हर्ष दुबेने कर्णधार वाडकरची साथ दिली होती. याचदरम्यान वाडकरनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे पिछाडीवर पडलेला विदर्भ संघाच्या आता विजयाच्या आशाही जिवंत राहिल्या आहेत. चौथ्या दिवस अखेर वाडकर 56 धावांवर नाबाद आहे. तसेच हर्ष दुबे 11 धावांवर नाबाद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.