Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Ranji Trophy 2024-25: सर्विसेसविरूद्ध ३३९ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ५३ धावांवर महाराष्ट्राने ३ विकेट्स गमावले आहेत. तर पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येमुळे ओडिसाविरूद्ध मुंबईकडे १९१ धावांची आघाडी आहे.
mumbai cricket
mumbai cricket esakal
Updated on

Maharashtra vs Services and Mumbai vs Odisha Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी स्पर्धेचा शेवटचा दिवस बाकी असून सर्विसेस संघाने माहाराष्ट्राला जिंकण्यासाठी ३३९ धावांचे आव्हान दिले आहे. त्यापैकी दिवस समाप्तीपर्यंत महाराष्ट्राने ५२ धावांचे लक्ष पार केले आहे. पण बदल्यात ३ विकेट्सही गमावले आहेत. त्यामुळे उद्या महाराष्ट्राला २८७ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. तर दुसरीकडे मुंबईने ओडिसाविरूद्ध पहिल्याच डावत मोठी आघाडी घेतली. त्यामुळे मुंबईने ओडिसाचा पहिला डाव २८५ धावांवर गुंडाळून दुसऱ्या डावासाठी फॉलो ऑन दिला. तिसऱ्या दिवसाअंती मुंबई सामन्यात १९१ धावांनी आघाडीवर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.