Maharashtra vs Services Ranji Trophy 2024-25: महाराष्ट्राविरूद्ध सर्विसेस संघाने पहिल्या डावानंतर १०८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र सर्विसेसचा दुसरा डाव लवकर गुंडाळेल अशी अपेक्षा होती. पण अमित शुक्ला अर्धशतकीय खेळी करत सर्विसेसचा डाव २०० पार घेऊन गेला आणि महाराष्ट्राला ३३९ धावांचे तगडे आव्हान दिले. सर्विसेसला रोखण्यात सत्यजित बच्छावने महत्वपुर्ण कामगिरी बजावली. सत्यजितने सर्विसेस ५ खेळाडूंना बाद केले.
सर्विसेस संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २९३ धावा केल्या. या डावात सर्विसेसच्या ४ खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी केली. तर महाराष्ट्राच्या हितेश वलुंजने या डावात पाच विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात महाराष्ट्रला अवघ्या १८५ धावा करता आल्या आणि महाराष्ट्र सामन्यात १०८ धावांनी पिछाडीवर गेला. या डावात अंकित बावणेने कप्तानी खेळी केली. तर सर्विसेसच्या अमित शुक्लाला ७ विकेट्स घेण्यात यश आले.
महाराष्ट्राला सामना जिंकण्यासाठी सर्विसेसला कमी धावांवर रोखणे गरजेचे होते. रणनिती नुसार महाराष्ट्राने सर्विसेसला लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये सत्यजित बाच्छावने महत्वपुर्ण योगदान दिले. सत्यजितने सर्विसेसच्या दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याला मुकेश चौधरीने २ विकेट्स घेत व हितेश वलुंजने २ विकेट्स घेत सहकार्य केले.
पहिल्या डावात महाराष्ट्राचे ७ विकेट्स घेणाऱ्या अमित शुक्लाने फलंदाजीमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली. अमितने ५० चेंडूत ५१ धावांची खेळी केली. अमित व्यतिरिक्त सर्विसेसच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. सर्विसेसने सामन्यची सुरूवात संथ खेळीने केली होती. पण ४४ धावांवर पहिला विकेट गेला आणि सर्विसेसचा डाव घसरण्यास सुरूवात झाली. पण अमितच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने सर्विसेसने २३० धावांचा टप्पा गाठला आणि मुंबईसमोर ३३९ तगडे आव्हान ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.