Ranji Trophy 2024-25: भारतातील प्रतिष्ठेची देशांतर्गत स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामही सप्टेंबरमध्ये सुरू झाला होता. या हंगामातील आता पहिला टप्पा शनिवारी (१६ नोव्हेंबर) संपला. आता दुसरा टप्पा पुढीलवर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात अनेक खेळाडूंकडून अफलातून खेळ पाहायला मिळाला. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने प्रभावित केले. काही संघांची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली, तर काही संघांची अगदीच खराब कामगिरी झाली.
प्रत्येक संघ पहिल्या टप्प्यात ५-५ सामने खेळले. ३८ संघात होणाऱ्या या स्पर्धेत मुख्यत: एलिट आणि प्लेट अशी विभागणी केलेली आढळते. एलिटमध्ये ३२ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटात ८ संघ आहेत.
तसेच प्लेटमध्ये ६ संघ खेळत आहेत. दरम्यान, या पाचही गटांमध्ये बडोदा, विदर्भ, हरियाना, तामिळनाडू आणि गोवा या संघांनी पहिल्या टप्प्यानंतर अव्वल स्थान मिळवले आहे.