Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer ०, पृथ्वी शॉ ७ अन् अजिंक्य रहाणे...; मुंबईची लागलीय वाट, ६ खेळाडू तंबूत परतले

Ranji Trophy 2024 MUM vs BDA Shreyas Iyer : गतविजेत्या मुंबई संघाला रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बदोडाविरुद्धच्या लढतीत मुंबईचे ६ फलंदाज फार कमी धावसंख्येवर तंबूत परतले आहेत.
shreyas iyer
shreyas iyeresakal
Updated on

MUM vs BDA Shreyas Iyer : मुंबई आणि बदोडा यांच्यात सुरू असलेला रणजी करंडक स्पर्धेचा सामना टप्प्याटप्प्याला वळ घेताना दिसतोय. प्रथम फलंदाजीला आलेल्या बदोडा संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीला कोंडीत पकडले होते, परंतु त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी डाव उलटवला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मुंबईने झटपट विकेट्स घेतल्या आणि बदोडाचा पहिला डाव गुंडाळला. प्रत्युत्तरात मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या.

कालच्या ६ बाद २४१ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या बदोडा संघाचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. मितेश पटेलने १५९ चेंडूंत ८ चौकारांसह सर्वाधिक ८६ धावा केल्या. ए शेठने १५४ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. राज लिम्बानीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईकडून तनुष कोटियनने ४, शाम्स मुलानीने ३, शार्दूल ठाकूरने २ विकेट्स घेतल्या. २९० धावांवर बदोडा संघाला गुंडाळल्यानंतर मुंबईला मोठी आघाडी घेण्याची संधी होती.

shreyas iyer
Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

पृथ्वी शॉ (७ ) नवव्या षटकात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. आयुष म्हात्रे व हार्दिक तामोरे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. मुंबईचा संघ चांगल्या टचमध्ये दिसत असताना भार्गव भटने धक्का दिला. आयुष ७१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. त्यानंतर हार्दिक व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. महेश पिथियाने मुंबईला तिसरा धक्का देताना हार्दिकला ४० धावांवर बाद केले.

रहाणे मैदानावर उभा राहिल असे वाटले होते, परंतु तो २९ धावांवर भटच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने पुन्हा निराश केले. ८ चेंडू खेळून तो एकही धाव न करताच तंबूत परतला. भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेला श्रेयस प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मागील ९ डावांमध्ये तीनवेळा भोपळ्यावर माघारी परतला. शाम्स मुलानी १६ धावांवर बाद झाल्याने मुंबईची अवस्था ६ बाद १६९ धावा अशी झाली आहे. अजूनही मुंबईचा संघ ११५ धावांनी पिछाडीवर आहे. सिद्धेश लाड व शार्दूल ठाकूर मैदानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.