Ranji Trophy 2024: मुंबईचा दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न; हिमांशूची फलंदाजीपोठापाठ गोलंदाजीतही चमक

Ranji Trophy 2024-25 Tripura vs Mumbai: रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा तिसरा सामना त्रिपुराविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबई आज प्रयत्न करताना दिसेल.
Himanshu Shingh | Mumbai Cricket | Ranji Trophy
Himanshu Shingh | Mumbai Cricket | Ranji TrophySakal
Updated on

Tripura vs Mumbai: सलामीच्या लढतीत बडोदेकडून अनपेक्षितपणे हार पत्करल्यानंतर गतविजेत्या मुंबईच्या क्रिकेट संघाने पुढील लढतीत महाराष्ट्राला पराभूत करीत झोकात पुनरागमन केले. आता त्रिपुराविरुद्धच्या रणजी क्रिकेट करंडकातील अ गटातील लढतीत मुंबईचा संघ १५५ धावांनी पुढे आहे.

या लढतीचा आज (२९ ऑक्टोबर) अखेरचा दिवस असणार आहे. निकाल लागण्याची शक्यता कमी असली तरी मुंबईचा संघ विजयासाठी प्रयत्न करतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मुंबईच्या संघाने पहिल्या डावात ४५० धावा केल्यानंतर त्रिपुरा संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद ६० धावा केल्या होत्या. सलामी फलंदाज जीवनज्योत सिंग याने १८८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकारांसह ११८ धावांची मौल्यवान खेळी साकारली. श्रीदाम पॉलने ५२ धावांची खेळी करीत जीवनज्योत सिंगला उत्तम साथ दिली.

Himanshu Shingh | Mumbai Cricket | Ranji Trophy
Ranji Trophy 2024: महाराष्ट्राकडे पहिल्या विजयाची सुवर्णसंधी; मेघालयाविरुद्ध गोलंदाज चमकले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.