Ranji Trophy 2024: महाराष्ट्रावर मेघालयाचा अनिरुद्ध पडला भारी; १४० धावांच्या नाबाद खेळीने गोलंदाज हैराण

Maharashtra vs Meghalaya Ranji Trophy 2024: महाराष्ट्राविरूद्धच्या सामन्यात मेघालयाने पहिल्या दिवशी ८ विकेट्स गमावत २७४ धावा केल्या आहेत.
Balchander Anirudh
Balchander Anirudhesakal
Updated on

Maharashtra vs Meghalaya Ranji Trophy 2024: महाराष्ट्र-मेघालया रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या फेरीच्या सामन्याला आजपासून सुरूवात झाली. मागच्या सामन्यात महाराष्ट्राला मुंबईविरूद्ध पराभव पत्कारावा लागला होता. तर जम्मू काश्मिरविरूद्धचा पहिला सामना अनिर्णीत राहिला. आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेघालयाने महाराष्ट्राविरूद्ध जोरदार फटकेबाजी करत पहिल्या दिवसाअंती ८ विकेट्स गमावून २७४ धावा केल्या. ज्यामध्ये बालचंदर अनिरुद्ध शतकी खेळी करून १४० धावांवर नाबाद आहे.

मेघालयाचा सलामीवर बामनभा शांगपलियांग आक्रमक फलंदाजी करत होता, तर दुसऱ्या बाजूने अर्पित भाटेवाला संथ खेळी खेळत होता. त्याने ७ धावा करण्यासाठी ३१ चेंडू घेतले व १५ व्या षटकात बाद झाला. २० व्या षटकात साथीदार बामनभाही झेलबाद झाला.

Balchander Anirudh
Ranji Trophy 2024: मुंबई संघाला सावरण्यात यश आले, पण शतक पुर्ण करण्यात अपयशी ठरला Suryansh Shedge

पुढे अजय राधाकृष्ण दुहान व बालचंदर अनिरुद्धने सान्यात गती पकडली. दोघांची शतकी भागीदारी पुर्ण होताच अजयने साथ सोडली, तो ३४ धावांवर त्रिफळाचित झाला. महाराष्ट्राच्या रजनीश गुरबानीला त्यांची भागीदारी मोडण्यात यश आले.

त्यानंतर बालचंदरने किशनला साथीला घेत फटकेबाजी सुरूच ठेवली. किशनने संघाच्या धावसंख्येत २२ धावांची भर टाकली व तो झेलबाद होऊन परतला. त्यानंतर मेघालयाचा डाव एका बाजूने घसरायला सुरूवात झाली. पण दुसऱ्या बाजूने बालचंदर धावा करत राहीला आणि पहिल्या दिवशी मेघालयाला २७४ धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्वाचे योगदान दिले.

Balchander Anirudh
WTC 2025: भारतानं मालिका तर हरलीच, पण Points Table मधील अव्वल नंबरही धोक्यात; न्यूझीलंड आता कोणत्या स्थानी?

सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या रजनीश गुरबानीला ३ विकेट्स घेण्यात यश आले. मुकेश चौधरीने २ विकेट्स घेतल्या. तर, प्रदीप दाढे, सिद्धेश वीर, व हितेश वळंजू यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.