Ranji Trophy 2024 Final : मुंबईचा पलटवार! सामन्यावर मिळवली मजबूत पकड

Ranji Trophy
Ranji Trophy esakal
Updated on

Ranji Trophy Final : वानखेडे स्टेडियवर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची अवस्था बिकट झाली होती. त्यांचा संपूर्ण संघ 224 धावात गारद झाला. मात्र मुंबईने विदर्भची देखील अवस्था बिकट करत सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले.

मुंबईने दुसऱ्या दिवशी भेदक मारा करत विदर्भचा पहिला डाव 105 धावात संपुष्टात आणला. पहिल्या डावात 119 धावांची मोठी लीड मिळाल्यानंतर मुंबईने आता आपला दुसरा डाव सुरू केला आहे. मुंबईकडून सर्व गोलंदाजांनी प्रभावी मारा केला.

Ranji Trophy
IPL 2024 Rohit Sharma : '... जर धोनी निवृत्त झाला तर रोहित CSK चं नेतृत्व करू शकतो'

वानखेडेच्या हिरव्या खेळपट्टीवर विदर्भने मुंबईच्या कसलेल्या फलंदाजीला मोठं भगदाड पाडलं होतं. पहिल्या डावात मुंबईची अवस्था 2 बाद 89 धावांवरून 5 बाद 111 धावा अशी झाली होती. त्यानंतर शार्दुल ठाकूरने 75 धावांची झुंजार खेळी करत मुंबईला 200 धावांचा टप्पा पार करून दिला होता. विदर्भकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर विदर्भने पहिला डाव सुरू केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक धक्के देत विदर्भची अवस्था 5 बाद 79 धावा अशी करून टाकली. अखेर यश राठोडने केलेल्या 27 धावांच्या जोरावर विदर्भने शतकी मजल मारली. मात्र तनुष कोटियानने राठोड अन् उमेशला बाद करत विदर्भचा डाव 105 धावांवर संपुष्टात आणला.

Ranji Trophy
Rishabh Pant Fitness IPL 2024 : याच चिठ्ठीची होती प्रतिक्षा... अखेर ऋषभ पंतला मिळाली गूड न्यूज

पहिल्या डावात मुंबईने 119 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश ठाकूर आणि दुबेने पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानीला स्वस्तात बाद करत मुंबईला दोन धक्के दिले. सध्या मुंबईच्या 48 धावा झाल्या असून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा मुशीर खान क्रीजवर आहेत.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.